मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार बॉलर जसप्रीत बुमराहसाठी (Jasprit Bumrah) वाईट बातमी आहे. बुमराहची आयसीसी वनडे रँकिंगमध्ये गोलंदाजांच्या यादीत नुकसान झालंय. बुमराहची आयसीसी रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्याचा मोठा फायदा झाला आहे. पंड्याने रँकिंगमध्ये 13 स्थानांची उडी घेत थेट 8 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (icc odi ranking team india yorker king jasprit bumrah loss his no 1 spot)
टीम इंडिया इंग्लंडवर एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. बुमराहला फिटनेसमुळे तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला मुकावं लागलं. त्याचा फटका बुमहारला बसला आहे. यामुळेच बुमराहला अव्वल स्थान गमवावं लागलंय. आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा बॉलर ट्रेन्ट बोल्ट 704 रेटिंग्सह पहिल्या स्थानी आहे. तर बुमराह बोल्टपेक्षा 1 पॉइंटने पिछाडीवर आहे.
टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने 4 स्थानांनी झेप घेतली आहे. तर हार्दिक 8 स्थानांची झेप घेत 42 व्या क्रमांकावर येऊन पोहचला आहे. पंड्याने इंग्लंड विरुद्ध 6 विकेट्स आणि 100 पेक्षा अधिक धावा केल्या. तर ऋषभ पंतलाही चांगला फायदा झालाय. पंत थेट 25 व्या स्थानांनी वर येत 52 व्या क्रमांकावर आला आहे.