आयसीसीने मैदानात पाकिस्तानच्या खेळाडूंना हातातली घड्याळं काढायला लावली

आयसीसीचा क्रिकेट खेळाडूंना धक्का

Updated: May 25, 2018, 04:23 PM IST
आयसीसीने मैदानात पाकिस्तानच्या खेळाडूंना हातातली घड्याळं काढायला लावली title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्लब म्हणजेच आयसीसीने म्हटलं की, मॅच सुरु असतांना मैदानावर खेळाडू स्मार्ट वॉच नाही घालू शकत. आयसीसीने शुक्रवारी एका मीडिया रिलीजच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीने खेळाडूंना मैदानावर कोणत्याही संपर्क साधता येईल असे उपकरण मैदानावर नेण्यास मनाई केली आहे. हाच नियम ड्रेसिंग रूममध्ये देखील लागू आहे.

मॅच फिक्सिंगच्या कोणत्याही आरोपपासून वाचण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना लार्ड्समध्ये पहिल्या टेस्टमध्ये वॉच घालण्यावव बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीने म्हटलं की, खेळाडू आणि मॅचच्या अधिकाऱ्यांना मैदानात आणि मैदानाच्या आवारात अशा वस्तू वापरण्यास बंदी आहे. 

इंग्लंडच्या विरुद्ध लॉर्ड्समध्ये सुरु झालेल्य़ा पहिल्या सामन्यात पहल्याच दिवशी पाकिस्तानचे खेळाडू स्मार्ट वॉच घालून मैदानावर उतरले होते.