वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूला पछाडत रवींद्र जाडेजाची पुन्हा 'एक नंबर' कामगिरी

टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी मोठा कारनामा केलाय. 

Updated: Mar 23, 2022, 05:30 PM IST
वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूला पछाडत रवींद्र जाडेजाची पुन्हा 'एक नंबर' कामगिरी title=

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) आयपीएलच्या 15 व्या हंगामाआधी मोठा कारनामा केलाय. आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमवारीत (Icc test All Rounder Ranking) जाडेजा पुन्हा अव्वल ठरला आहे. जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला (Jason Holder) पछाडत पुन्हा ऑलराऊंडर रँकिंगमधील अव्वल स्थान मिळवलंय. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयसीसीच्या रँकिंगमध्ये होल्डरने जाडेजाला मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली होती. मात्र आता पुन्हा जाडेजाने पहिलं स्थान काबीज केलंय. (icc mens test rankings team india all rounder ravindra jadeja surpassed to west indies jason holder and again no 1) 

जाडेजा आणि होल्डर या दोघांच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये 28 गुणांचा फरक आहे. जाडेजाच्या नावावर 385 तर होल्डरच्या नावे  357 रेटिंग्स पॉइंट्सची नोंद आहे. तर रवीचंद्रन अश्विनने 341 पॉइंट्ससह तिसरं स्थान कायम राखलंय.

हिटमॅन रोहितचं नुकसान

एकाबाजूला जाडेजाने शानदार कामगिरी केलीय. तर  दुसऱ्या बाजूला कॅप्टन रोहित शर्माल मोठा धक्का बसलाय. रोहितची 6 व्या स्थानावरुन 7 व्या स्थानी घसरण झालीय. रोहितकडे 754 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.

तर पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमने फलंदाजांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे.  बाबरला 3 क्रमांकाचा फायदा झालाय. बाबरने  8 वरुन थेट 5 व्या स्थानी उडी घेतलीय.  बाबरकडे 799 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.