ICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान!

ICC Men's T20I Team of the Year 2022: दरवर्षी आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय संघ जाहीर केला जातो. त्यानंतर आता आयसीसीकडून सर्वोत्तम T20I संघ जाहीर करण्यात आलाय. तर जॉस बटलरकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आलीये.

Updated: Jan 23, 2023, 04:39 PM IST
ICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान! title=
ICC Men's T20I Team

ICC Men's T20I Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) पुरुष T20I 'टीम ऑफ द ईयर' जाहीर केली आहे. मागील वर्षी आयसीसीच्या स्पर्धेत खास कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची ही यादी घोषित (ICC Men's T20I Team of the Year 2022) करण्यात आली आहे. आयसीसीच्या संघात 3 भारतीय खेळाडूंना जागा मिळवण्यात यश मिळालंय. तर इंग्लंडला 2023 चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या जॉस बटलरला ICC च्या सर्वोत्तम T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय. (ICC Men's T20I Team of the Year 2022 revealed Virat Kohli Suryakumar yadav Hardik pandya named marathi sports news)

भारताच्या 'या' तीन खेळाडूंना स्थान - 

आयसीसीच्या संघात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik pandya) यांनी स्थान मिळवलंय. टीम इंडियाचे तीन खांब म्हटले जाणाऱ्या विराट, सूर्या आणि हार्दिकला स्थान मिळाल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. विराट कोहलीसाठी मागील वर्षाच्या अखेरीस सूर गवसला. विराटने आशिया चषक (Asia Cup) आणि T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली होती.

सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) हा या वर्षातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज ठरलाय. सूर्याच्या वादळी खेळीमुळे सर्वांचं मन जिंकलं. त्यानं 31 सामन्यात 46.56 च्या सरासरीने, तसेच 187.43 च्या स्ट्राइक रेटने तब्बल 1,164 रन्स केल्या आहेत. यामध्ये त्याने 9 हाफ सेंच्युरी आणि 2 खणखणतीत शतक देखील ठोकलंय. 

Kieron Pollard: 'शेर बूढा जरूर हुआ है, मगर...', मुंबईच्या 'बिग बॉस'कडून बॉलर्सची धुलाई; पाहा Video

दरम्यान, नुकतंच प्रमोशन झालेल्या हार्दिक पांड्याला (Hardik pandya) देखील ऑलराऊंडरच्या रुपात संघात स्थान दिलंय. विशेष गोष्ट म्हणजे, टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला आयसीसीच्या 11 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवता आलं नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) संघातून डच्चू मिळाला आहे. 

ICC Men's T20I Team of the Year 2022:

जॉस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पांड्या, सॅम कुरन, वानिंदू हसरंगा, हरिस राऊफ, जोश लिटल.