ICC Men's T20 World Cup : हुड्डा आता तर मी निघून जाईल..., Virat Kohli असं का म्हणाला? Video व्हायरल

T20 World Cup पुर्वी विराट कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात Virat Kohli ने दीपक हुड्डाला काय म्हणाला ते तुम्हीच पाहा

Updated: Oct 14, 2022, 04:51 PM IST
ICC Men's T20 World Cup : हुड्डा आता तर मी निघून जाईल..., Virat Kohli असं का म्हणाला? Video व्हायरल title=

Virat Kohli : आगामी ICC Men's T20 World Cup साठी आता टीम इंडिया (Team India) मैदानावर घाम गाळताना दिसत आहे. बुमराह आणि जडेजाची कमकरता जाणवू नये, यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) वेगवेगळे पर्याय वापरताना दिसतोय. तर दुसरीकडे टीम इंडियाची शान विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा फॉर्ममध्ये आला असून तो देखील कसून तयारी करतोय. अशातच आता विराट कोहलीचा (Virat Kohli Video) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय.

पार्थच्या (Parth) मैदानावर विराट कोहली बॅटिंगची जोरदार तयारी करतोय. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या उसळी घेणाऱ्या बॉलसाठी अनुकूल राहिल्या आहेत. त्यामुळे भारतीय फलंदाजांना खेळणं अवघड जाऊ शकतं. त्यासाठीच आता विराट अॅड कंपनी तयारी करत आहे. अशातच सराव करत असताना विराट कोहलीचं एक वाक्य व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालंय. त्यामध्ये विराट जे बोलला ते ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा - Suryakumar Yadav ला 'या' नावाने हाक मारतो विराट कोहली!

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विराट कोहली नेट प्रॅक्टिस (Virat Kohli net practice) करताना दिसतोय. कोणीतरी मागून ओरडून सांगतो की, विराट तुझी वेळ संपली आहे. नेट प्रॅक्टिस करताना खेळाडूंना वेळ ठरवून दिलेला असतो. त्यावेळी विराटच्या नेट प्रॅक्टिसची वेळ संपली होती. त्यावर विराटने देखील खेळता खेळता प्रत्युत्तर दिलं.

पाहा व्हिडीओ - 

"हा... हा... हुड्डा (Deepak Hooda) आला तर मी निघून जाईल, त्याच्या येण्याची वाट पाहतोय", असं विराट म्हणतोय. भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. येत्या 23 ऑक्टोबरला भारतीय संघ आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धाशी भिडेल. त्यामुळे आता विराट कोहली या सामन्यात कशी कामगिरी करणार यावर सर्व चाहत्यांचं लक्ष आहे.