मुंबई : टीम इंडियासाठी वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचपासून वादाला तोंड फुटले आहे. धोनीला बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घालण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही आयसीसीकडे केली आहे. अशी माहिती सीओएचे सर्वेसर्वा विनोद राय यांनी केली आहे.
महेंद्रसिंह धोनीला त्या चिन्हासह परवानगी मिळणं कठीण दिसतं आहे. आयसीसीच्या नियमांनुसार यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजवर एकाच प्रायोजकाचं चिन्हं लावण्यास परवानगी आहे. त्यानुसार धोनीच्या ग्लोव्हजवर एसजी या प्रायोजकाचं चिन्हं आहे. मात्र धोनीने लावलेल्या चिन्हाला परवानगी दिल्यास कराराचा भंग होण्याची शक्यता आहे. धोनीच्या ग्लोव्हवरील चिन्हं लष्करी नाही हे बीसीसीआयने आयसीसीला पटवून देणं गरजेचं आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीला हे पटलं तरच धोनी चिन्हासह ग्लोव्हज वापरू शकणार आहे.
टीम इंडियाने वर्ल्डकपमधील पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आली. यामॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या मॅचमध्ये धोनीने बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले होते. यानंतर आयसीसीने बीसीसीआयला धोनीला हे ग्लोव्हज घालू नये, याबाबत सांगितले होते. धोनीला ते ग्लोव्हज घालता यावे यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती,
सूत्रांनी दिली आहे. ही परवानगी मुंबईत पार पडलेल्या एका बैठकीदरम्यान मागण्यात आली.
धोनीने घातलेल्या ग्लोव्हजमुळे कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नाही. धोनीला ते ग्लोव्हज घालण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही आयसीसीकडे केली आहे. आम्ही या प्रकरणी आयसीसीला पत्रव्यवहार केला आहे. तसेच याबाबतीत आयसीसीचे काही नियम असतील तर आम्ही त्या नियमांचे पालन करु असे देखील विनोद राय म्हणाले.
धोनीने बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घालू नये, असे आयसीसी म्हणाली. त्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहे. नेटकऱ्यांनी आयसीसीला ट्विटर द्वारे चांगलेच ट्रोल केले आहे. ट्विटरवर धोनीच्या समर्थन मिळत आहे. #DhoniKeepTheGlove हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.