चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत

चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे. 

Updated: Jun 10, 2017, 10:30 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियाला जिंकावी लागणार द. आफ्रिकेविरुद्धची लढत title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत जिंकाविच लागणार आहे. श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट सेनेला आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. 

खासकरुन फिल्डिर्सना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. भारतीय बॅट्समन चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, त्यांना बॉलर्सची योग्य साथ मिळालेली नाही. 

रोहित शर्मा आणि शिखर धवन या ओपनिंग जोडीनं दोन्ही मॅचेसमध्ये  भारताला शानदार ओपनिंग करुन दिली. आता या मॅचमध्येही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. तर केदार जाधवऐवजी अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.