IPL 2021 | मला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, 'या' दिग्गज कर्णधाराची कबूली

या संघाच्या कर्णधाराने आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एकूण 13 सामन्यांमध्ये 111 धावा केल्या आहेत.

Updated: Oct 4, 2021, 04:52 PM IST
IPL 2021 | मला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, 'या' दिग्गज कर्णधाराची कबूली title=

यूएई : आयपीएलमध्ये (IPL) मला अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश येतंय. मात्र मला विश्वास आहे की मी मोठी खेळी करेन, असं कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR Captain) कर्णधार इयोन मॉर्गन (Eoin Morgan) म्हणाला. "हो, मी या स्पर्धेतील या मोसमात म्हणा किंवा या स्पर्धेतच धावा करु शकलो नाही. जेव्हा तुम्ही दीर्घ काळ चांगली कामगिरी करत नाहीत, तेव्हा तुम्ही मोठ्या खेळीच्या जवळ असता", असं ईयोन म्हणाला. (I have not been able to score runs in this stage of the tournament or rather in the entire tournament says kkr captain eoin morgan after win against srh)

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात हैदराबादला 115 धावांवर रोखल्याने कोलकाताला 116 धावांचे आव्हान मिळाले. कोलकाताने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यानंतर ईयोन बोलत होता. मॉर्गनने या मोसमातील 13 सामन्यांमध्ये 111 धावा केल्या आहेत. मॉर्गनची 47* ही या मोसमातील सर्वोच्च धावसंख्या आहे.

वरुण आणि सुनीलबाबत काय म्हणाला?

"आमच्या ताफ्यात सुनील आणि वरुणसारखे फिरकी गोलंदाज आहेत, हे आमचं भाग्य आहे, असंही मॉर्गन म्हणाला. या दोघांनी केकेआरमध्ये सर्वाधिक प्रभाव सोडला आहे. "आम्ही भाग्यवान आहोत, आमच्याकडे हे दोन्ही विशेष म्हणजे नारायणसारखा खेळाडू आहे. नारायण गेल्या अनेक वर्षांपासून केकेआरचा भाग आहे", असंही मॉर्गनने नमूद केलं. 

"वरुण आणि नारायण व्यतिरिक्त इतर गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली. त्यामुळे सामना आमच्याबाजूने झुकण्यास मदत झाली", असंही मॉर्गनने सांगितलं.

हैदराबादला पराभूत करण्यामध्ये कोलकाताच्या सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडीचं मोठं योगदान राहिलं. सुनीने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 12 धावा देत चिवट गोलंदाजी केली. त्यामुळे फलंदाजांवर दबाव निर्माण झाला. तर दुसऱ्या बाजूला वरुणने 4 षटकांमध्ये 26 धावा देत 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

शुबमन गिलचं कौतुक 

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात कोलकाताचा सलामीवीर शुबमन गिलने  51 चेंडूत 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. शुबमनच्या या खेळीचं मॉर्गनने कौतुक केलं. 

"मी शुबमन गिलसाठी आनंदी आहे. शुबमनने तो टी 20, वनडे आणि कसोटी या कोणत्याही प्रकारात खेळू शकतो, हे सिद्ध केलंय. शुबमन सलग 2 मोसमांपासून शानदार कामगिरी करतोय. शुबमनने आजही या आव्हानात्मक खेळपट्टीवर सहज धावा काढल्या. शुबमनने आपल्या कौशल्य दाखवून दिलं. त्याने आपल्या बॅटिंगचा उत्तम नमूना सादर केला", अशा शब्दात मॉर्गनने गिलचं कौतुकं केलं.

कोलकाताची कामगिरी

कोलकाताच्या या मोसमातील 13 सामन्यांमध्ये 12 पॉइंट्स आहेत. कोलकाताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे कोलकाताला प्लेऑफमध्ये धडक मारण्यासाठी अखेरचा साखळी सामना जिंकावा लागणार आहे. दरम्यान त्याआधी चेन्नई,  दिल्ली आणि बंगळुरुने प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे.