'मी विराटला मेसेज केला होता...' अन् पाकिस्तानी खेळाडू किंग कोहलीसमोर खदाखदा हसले!

Agha Salman Statement : पाकिस्तानी खेळाडू आगा सलमान याने विराट कोहलीला आयपीएल 2023 मध्ये गौतम गंभीर यांच्यासोबत झालेल्या वादानंतर इन्टाग्रामवर मॅसेज पाठवला होता. हा मॅसेजबद्दल एशिया कप 2023 मध्ये चर्चा सुरू होती. पाकिस्तान सुपर लीगमधील इस्लामाबाद यूनाइटेडसाठी खेळणारा सलमान यानं कोहलीला काय लिहिलं याचा खुलासा मात्र केला नाही.  

Updated: Mar 3, 2024, 07:02 PM IST
'मी विराटला मेसेज केला होता...' अन् पाकिस्तानी खेळाडू किंग कोहलीसमोर खदाखदा हसले! title=

Agha Salman Message to Virat kohli : क्रिकेट चाहत्यांना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाबद्दल माहिती आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू मैदानावर आमने-सामने आले तेव्हा वाद होणार हे निश्चतीच... गेल्या वर्षी आयपीएलमध्येही दोघांमध्ये वाद झाला होता. गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता आणि कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) साठी खेळत होता. एका सामन्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. या वादानंतर पाकिस्तानी खेळाडू आगा सलमान याने विराट कोहली याला मॅसेज पाठवला होता. सलमान याने स्वतः याचा खुलासा केला आहे. 

सलमानने सांगितलं की, जेव्हा आयपीएल दरम्यान कोहली आणि गंभीर या दोन्ही दिग्गजांमध्ये वाद झाला तेव्हा त्याने विराटला इस्टाग्रामवर मॅसेज पाठवला होता.

आगा सलमान याने विराट कोहलीबाबत काय म्हटले?

आगा सलमान याने एका मुलाखतीत म्हटले, "विराटसाठी माझ्या मनात खूप आदर आहे. मला वाटत नाही की जगात असा एकही क्रिकेटप्रेमी असेल जो त्याचा आदर करत नाही. मी त्याला मेसेज पाठवला होता, आणि मी त्या मॅसेजची सुरुवात 'विराट भाई' अशी केली होती. जेव्हा त्याचा गौतम गंभीर यांच्याशी वाद झाला तेव्हा मी त्याला हा मॅसेज पाठवला होता." सलमान पुढे म्हणाले, "मी, अब्दुल्ला शफीक आणि उसामा मीर एकत्र बसून सामना पाहत होतो. मला वाटतं न्यूझीलंड त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळत होता. विराटला पाठवलेल्या मेसेजमध्ये काहीही चुकीचे नव्हतं ज्यामुळे लोकांना वाटलं की मी काही वाईट म्हटले आहे.  विराट जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तेव्हा शादाब खान याने त्याला सलमानच्या मॅसेजबद्दल सांगितले. त्यांच्या संभाषणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

एशिया कप दरम्यान मेसेजची चर्चा झाली

सलमान म्हणाले, "मी चुकून शादाब खान याला विराटला मेसेज करण्याबद्दल सांगितले होते. तुम्ही एशिया कप दरम्यान माझे, शादाब आणि विराट एकत्र उभे असलेले व्हिडिओ पाहिले असेल. खरं तर त्यावेळी शादाब याने विराटला माझ्या मेसेजबद्दल सांगितले होते. जेव्हा शादाब यांनी विराटला सांगितले की मी तुम्हाला हा मेसेज केला आहे तेव्हा सगळे हसण्यास लागले. यानंतर त्याने म्हटले की कदाचित मला मेसेज मिळाला नसेल कारण विराटला दररोज हजारो मेसेज मिळतात."