मुंबईची बॅटिंग गडगडली, हैदराबादला विजयासाठी १४८ रन्सची आवश्यकता

हैदराबादविरुद्धच्या टी-20मध्ये मुंबईची बॅटिंग गडगडली आहे.

Updated: Apr 12, 2018, 09:50 PM IST
मुंबईची बॅटिंग गडगडली, हैदराबादला विजयासाठी १४८ रन्सची आवश्यकता title=

हैदराबाद : हैदराबादविरुद्धच्या टी-20मध्ये मुंबईची बॅटिंग गडगडली आहे. मुंबईनं हैदराबादपुढे विजयासाठी १४८ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे. २० ओव्हरमध्ये मुंबईनं ८ विकेट गमावून १४७ रन्स केल्या. मुंबईकडून एव्हिन लुईसनं सर्वाधिक २९ रन्स केल्या. तर सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्डनं प्रत्येकी २८ रन्स केल्या. हैदराबादच्या संदीप शर्मा, बिली स्टॅनलेक आणि सिद्धार्थ कौलला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या. तर राशीद खान आणि शाकिब अल हसनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या मॅचमध्ये हैदराबादनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबईचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला होता. त्यामुळे ही मॅच जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये पहिले अंक मिळवण्याचं आव्हान रोहित शर्माच्या टीमपुढे असणार आहे. तर हैदराबादनं मात्र त्यांचा सलामीचा सामना जिंकला होता. त्यामुळे त्यांच्याकडे २ पॉईंट्स आहेत.