IPL 2024 CSK vs RCB: अवघ्या 2 दिवसांनी क्रिकेटचे आतुरतेने वाट पाहत असलेला दिवस येणार आहे. आयपीएलच्या 17 व्या सिझनला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. यावेळी पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यासोबत होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर या दोन्ही टीम्स आमने-सामने येणार आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. यावेळी सामन्याचं तिकीट कुठे मिळू शकणार याची माहिती जाणून घेऊया.
IPL 2024 च्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारी म्हणजेच 18 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाली आहे. यावेळी पेटीएम इनसाइडरच्या वेबसाइट आणि मोबाइल ऍप्लिकेशनला भेट देऊन तिकिटे खरेदी करू शकता. आयपीएल सामन्यात पहिल्यांदाच प्रेक्षक त्यांचे ई-तिकीट दाखवून मैदानात प्रवेश करू शकतील. त्यामुळे यावेळी प्रेक्षकांना तिकिटाच्या स्वरूपात स्लिप घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. एक व्यक्ती इंटरनेटद्वारे केवळ 2 तिकिटे खरेदी करू शकते.
बरेच लोक इंटरनेटवर तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे पेटीएम इनसाइडरची वेबसाइट तुम्हाला याबाबत माहिती देऊ शकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टेडियममधील रिकामी जागा निवडू शकता. तिकिटांची किंमत 1500 ते 7500 रुपयांपर्यंत आहे. आत्तापर्यंत IPL 2024 साठी फक्त 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. यावेळी उर्वरित वेळापत्रक लोकसभा निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन जाहीर करण्यात येणार आहे.
CSK vs RCB म्हणजेच IPL 2024 चा पहिला सामना चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. MS धोनीच्या टीमला घरच्या चाहत्यांसमोर विजयासह स्पर्धेची सुरुवात करायची आहे. हा सामना 22 मार्च रोजी होणार असून घरात बसून प्रेक्षक रात्री 8 वाजल्यापासून हा सामना लाईव्ह पाहू शकतात.
पहिल्या सामन्याबरोबरच चाहते आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचीही (Opening Ceremony) आतुरतेने वाट पाहात आहेत. दरवेळी प्रमाणेच यावेळीही बॉलिवूडचे अनेक सुपरस्टार उ्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्घाटन सोहळ्यात भारतीय संगीतकार एआर रहमान, सोनू निगम यांच्याबरोबर बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा परफॉर्म करण्याची शक्यता आहे.