Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला?

ICC Mens Test batting Ranking : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत (Rishabh Pant) 13 व्या स्थानावर होता, तो आला 12 व्या स्थानी आलाय. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं? 

सौरभ तळेकर | Updated: Feb 7, 2024, 07:16 PM IST
Rishabh Pant : एकही मॅच खेळली नाही, तरीही ऋषभ आयसीसीच्या 12 व्या रँकिंगला कसा पोहोचला? title=
Rishabh Pant ICC Test Ranking

Rishabh Pant ICC Test Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडियाला (Indian Cricket Team) देखील मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीची (Virat Kohli) रँकिंग एका स्थानाने घसरली असून विराट 7 व्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा केन विलयम्सन (Kane Williamson) अव्वल स्थानी विराजमान झालाय. तर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा स्टिवन स्मिथ (Steve SMITH) आहे. तर पाकिस्तानचा बाबर आझम पाचव्या स्थानी आहे. अशातच आता टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याला आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळतंय. 

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत अपघातात झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियामधून बाहेर आहे. त्याला मागील वर्षात एकही सामना खेळता न आल्याने त्याला आयसीसी कसोटी क्रमवारीत (Rishabh Pant ICC Test Ranking) मोठं नुकसान सहन करावं लागले अशी शक्यता होती. मात्र, नुकत्याच जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत ऋषभ पंतला मोठा फायदा झाल्याचं पहायला मिळतंय. ऋषभ पंतच्या खात्यात 714 पाईंट्स आहेत.

आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंत 13 व्या स्थानावर होता, परंतु ताज्या क्रमवारीनुसार ऋषभ पंत आता 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. खेळाडू खेळत नसताना त्याचं रँकिंग सुधारलं तरी कसं? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. याचच उत्तर जाणून घेऊ

झालं असं की... मागील वर्षात झालेल्या टेस्ट सामन्यात कोणत्याही खेळाडूंनी चांगली करता आली नाही. एवढंच काय तर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला देखील कसोटी क्रिकेटमध्ये साधारण कामगिरी करता आली. त्यामुळे त्याला त्याचा फटका बसलाय. खराब कामगिरीमुळे रोहित शर्माला कसोटी क्रमवारीत एक स्थान गमवावं लागलं आणि त्याचा रेटिंग पॉइंट पंतपेक्षाही कमी झाला. त्यामुळे पंतला फायदा झाला आणि तो रोहित शर्माच्या पुढे गेलाय.

आणखी वाचा - IPL 2024 : 'मी गॅरेंटी देऊन सांगतो...', ऋषभ यंदाची आयपीएल खेळणार की नाही? रिकी पाँटिंग म्हणतो...

दरम्यान, आयसीसीच्या टेस्ट टीम रँकिंगमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडियाला दुसऱ्या स्थानी विराजमान झालीये. त्यानंतर इंग्लंडचा संघ 115 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी आहे. तर साऊथ अफ्रिकेचा नंबर 4 थ्या स्थानी आहे.