Virat Kohli, Indian Team Selection: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. यावेळी पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियाने घेतला. यानंतर झालेल्या दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने 106 रन्सने इंग्लंडचा पराभव केला. दरम्यान या सिरीजसाठी पहिल्या केवळ 2 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता उर्वरित 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार यावर आता प्रश्नचिन्ह आहे.
दरम्यान गेल्या काही दिवासांपासून तिसऱ्या टेस्टमध्ये जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं होतं. याशिवाय पुढच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीचा समावेश केला जाणार का प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे.
तिसऱ्या सामन्यापूर्वी बीसीसीआयला शेवटच्या तीन टेस्ट सामन्यांसाठी भारतीय टीमही जाहीर करावा लागणार आहे. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. अशा स्थितीत तो टीममध्ये कमबॅक करू शकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडियाची घोषणा आज किंवा उद्या म्हणजेच 7 किंवा 8 फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर कामाच्या ताणामुळे बुमराहला तिसऱ्या टेस्टमधून विश्रांती दिली जाऊ शकते, अशा बातम्या समोर आल्या होती. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टदरम्यान टीमला जवळपास 10 दिवसांची विश्रांती मिळतेय. त्यामुळे एक गोलंदाज म्हणून बुमराहला पुरेशी विश्रांती मिळणार असून त्याचा तिसऱ्या टेस्टमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. जिंकण्याची लय टीम इंडियाची मॅनेजमेंट तोडू शकत नाही, त्यामुळे बुमराहला आराम देणं कठीण आहे.
काही वैयक्तिक कारणांमुळे टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने सिरीजमधील 2 सामन्यांमधून विश्रांती घेतली होती. विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात चर्चा झाली आहे. यावेळी विराट कोहली तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
दुसरा टेस्ट सामना जिंकल्यानंतर प्रशिक्षक द्रविड यांनी कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिलेक्टर्सना विचारणं योग्य ठरणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. सिलेक्टर्स काही दिवसांतच टीमची घोषणा करतील, असंही ते म्हणाले होते.