India vs Spain Hockey World Cup : टीम इंडियाने (Team India) हॉकी वर्ल्डकप (Hockey World Cup) 2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या टूर्नामेंटमध्ये पहिल्याच सामन्यात विजयाचा श्रीगणेशा करत भारतीय नागरिकांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने स्पेनच्या (ind vs esp) टीमचा 2-0 असा पराभव केला आहे.
टीम इंडियाकडून अमिक रोहिदास आणि हार्दिक सिंह यांनी गोल केले. टीम इंडियाकडून हे दोन्ही गोल फर्स्ट हाफमध्येच झाले होते. त्यानंतर क्वार्टरमध्ये एकंही गोल झाला नाही.
विजेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक असलेल्या भारताने 15व्या FIH वर्ल्डकपच्या पूल-डी सामन्यात स्पेनचा 2-0 असा पराभव केला. जगातील सर्वात मोठं हॉकी स्टेडियम म्हटल्या जाणार्या बिरसा मुंडा स्टेडियमवर 20,000 हून अधिक प्रेक्षक आजचा सामना पहायला आले होते. या सामन्यात अमित रोहिदास आणि हार्दिक यांनी भारतासाठी गोल केले. दरम्यान याच मैदानावर भारताला पुढील सामन्यात 15 जानेवारीला इंग्लंडशी मॅच खेळायची आहे.
भारताला सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये अमित रोहिदासने आघाडी मिळवून दिली. 12 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये त्याने गोल केला. यानंतर क्वार्टरमध्ये हार्दिक सिंहने आघाडी अजूनच वाढवली. हार्दिकने 26 व्या मिनिटाला मैदानी गोल करत टीमचा स्कोर 2-0 असा केला. त्यानंतर स्पॅनिश टीमला एकंही गोल करता आला नाही. टीम इंडियाचा शेवटची लीग मॅच 19 जानेवारी रोजी भुवनेश्वरमध्ये होणार आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया विरूद्ध फ्रान्स असा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने फ्रान्सला 8-0 ने पराभूत केलं. क्रेगने आठव्या, 31 व्या आणि 44 व्या मिनिटाला फील्ड गोल केले. तर हॅवर्डने 12 मिनिटांमध्ये 3 गोल करत फ्रान्सला बुचकाळ्यात पाडलं. याशिवाय माजी ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेने कडवी झुंज दिली होती. मात्र तरीही अर्जेंटिनाने हा सामना 1-0 ने जिंकला.