अमर काणे, झी मीडिया, नागपूर : काही वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रणव धनावडेने (Pranav Dhanawade) क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. 2016 साली शालेय क्रिकेट सामन्यात प्रणवने नवा विक्रम रचला. फक्त 15 वर्षांच्या प्रणवने शालेय क्रिकेटच्या फक्त एकाच सामन्यात तब्बल 1009 रन केले होते. प्रणवच्या या रेकॉर्डची आठवण करुन देणारी लक्षवेधी कामगिरी नागपुरच्या (Nagpur) यश चावडे (Yash Chawde) या खेळाडूने केली आहे. अंडर 14 क्रिकेट टूर्नामेंटमध्ये 508 धावा काढत शालेय क्रिकेट सामान्यात (School Cricket Tournament) त्याने 'यश'स्वी भरारी घेतली आहे. या क्रिकेट मॅचमध्ये आणखी एक विक्रम रचला गेला आहे. तो म्हणजे यश ज्या संघातर्फे खेळत होता त्या संघाने दिलेले 714 धावांचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ फक्त नऊ धावा काढूनच गारद झाला. या संघाचा लाजीरवाणा पराभव झाला.
अंडर 14 क्रिकेट टूर्नामेंट मध्ये यशने विक्रमी धावा काढत संघाला विजय मिळवून दिला आहे. 323 बॉलच्या या ऐतिहासिक खेळीमध्ये यश याने 59 सिक्स आणि 127 फोर लगावले आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे.
सरस्वती विद्यालयाने निर्धारित 40 षटकांत बिनबाद 714 धावांचा विक्रम रचला. सिद्धेश्वर विद्यालयाविरुद्ध खेळताना ही विक्रमी कामगिरी केली आहे. सलामीवीर यशने 81 चौकार व 18 षटकारांच्या मदतीने केवळ 178 बॉलमध्ये या 508 धावा काढल्या आहेत.
शालेय स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम मुंबईच्या प्रणव धनावडेच्या नावावर आहे. त्याने 1009 धावा काढल्या होत्या. 323 बॉलच्या या ऐतिहासिक खेळीमध्ये प्रणवने 59 सिक्स आणि 127 फोर लगावले. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर त्याने केला होता. यानंतर आता नागपुरच्या यशने आपल्या खेळीने कमाल केली आहे. अंडर 14 शालेय क्रिकेट टूर्नामेंट मध्ये सरस्वती विद्यालय विरुद्ध सिद्धेश्वर विद्यालय यांच्यात सामना रंगला. या सामन्यात सरस्वती विद्यालयाच्या टीमने जबरदस्त खेळी केली.
सरस्वती विद्यालयातर्फे खेळणाऱ्या यशचा सलामी जोडीदार तिलक वाकोडेनेही नाबाद शतक झळकावले. त्याने 13 चौकारांसह 97 बॉल मध्ये नाबाद 127 धावा केल्या. या एकदिवसीय मॅचमध्ये अजून एक विक्रम झाला या पहाडाएवढ्या धावांचा पाठलाग करताना सिद्धेश्वर विद्यालयाचा संघ 5 षटकांत केवळ 9 धावांतच गारद झाला. सरस्वती विद्यालयाने हा सामना 705 धावांच्या विशाल विक्रमी फरकाने जिंकला.