पाकिस्तानला हरवून दाखवाच - गुरबक्श सिंग

भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळले पाहिजे आणि त्यांना हरवलेही पाहिजे 

Updated: Feb 28, 2019, 09:08 AM IST
पाकिस्तानला हरवून दाखवाच - गुरबक्श सिंग title=

कोलकाता : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला पाकिस्तानसोबत संबंध ठेवणे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे यावर विवाद सुरु आहेत. अनेक भारतीयांचे पाकिस्तानशी संबंध ठेऊ नये असे म्हणणे आहे. आपल्या देशाशी असलेले पाकिस्तानचे क्रिडा संबंधही तोडावे असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे. हॉकी टीमचे माजी कर्णधार गुरबक्श सिंग यांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळले पाहिजे आणि त्यांना हरवलेही पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

यंदा जून महिन्यात भुवनेश्वरमध्ये हॉकी सीरीजच्या फायनल स्पर्धा होणार आहेत. ही टोक्यो ऑलिम्पिक २०२० साठी क्वलिफाइंग स्पर्धा घेण्यात येणार आहे. 'आपल्याकडे असणाऱ्या आंतराष्ट्रीय प्रतिबद्धतेला पूर्ण केले पाहिजे. आपण पाकिस्तासोबत केवळ दोन संघात होणाऱ्या सीरीज खेळणार नसून त्यांच्याशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे' त्यांनी सांगितले. आपण आपल्या पिढीच्या खेळाडूंचे करियर नष्ट करत आहोत. ही शरमेची बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या शूटिंग वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या दोन शूटर्सला व्हिसा देण्यात आला नव्हता. माजी भारतीय कर्णधार गुरबक्श सिंग यांनी 'त्यांना इथे येऊ द्या. ही आपली प्रतिबद्धता आहे. आपण पाकिस्तानशी मैत्री वाढवणार नाही. आपण दोन संघात होणाऱ्या सीरीजमध्येही खेळणार नाही. परंतु आपण त्यांच्याशी आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळायला हवे' असे त्यांनी म्हटले आहे. 

गुरूबक्श सिंग १९६४ ऑलिम्पिक आणि १९६६ मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या टीमचा भाग होते. '१९६५ मध्ये युद्ध झाले होते. जालंधरमध्ये आमचे शिबिर होते. १९६४ मध्ये आम्ही त्यांना हरवले आणि १९६५ साली झालेल्या युद्धानंतर आशियाई स्पर्धेतही आम्ही त्यांनी मात दिली होती' असे गुरूबक्श यांनी सांगितले. 

भारत-पाकिस्तान संबंधांवर यावेळी सर्वात अधिक क्रिकेट वर्ल्ड कपबाबत चर्चा होत आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली आणि हरभजन सिंगसह अनेक खेळाडूंनी भारताला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर यांनी पाकिस्तानसोबत खेळून त्यांना हरवले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.