'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा

Heinrich Klaasen hit Axar Patel for 24 Runs In Over What Rohit Sharma Said: अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तब्बल 24 धावा एकाच ओव्हरमध्ये निघाल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचं गणित अधिक सरळ आणि सोपं झालं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 20, 2024, 04:37 PM IST
'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा title=
पटेलनेच केला खुलासा

Heinrich Klaasen hit Axar Patel for 24 Runs In Over What Rohit Sharma Said:  टी-20 वर्ल्ड कप 2024 ची फायनल खेळवली गेली त्या दिवशी म्हणजेच 29 जून रोजी भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दोन वेळा फारच निराश झाला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना उत्तम सेट झाल्यानंतर तो अचानक बाद झाला त्यावेळेस तो फारच निराश झाला. त्यावेळेस त्याला जसप्रीत बुमराहने ड्रेसिंग रुममध्ये समजावल्याचं दिसून आलं. त्यानंतर भारताच्या गोलंदाजीच्या वेळी पटेलच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या हेन्री कार्ल्सनने तब्बल 24 धावा करत भारत पराभूत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण केली तेव्हा तो दुसऱ्यांदा निराशेच्या गर्तेत सापडला. मात्र त्यावेळेस भारतीय कर्णधार रोहित शर्मा पटेलच्या मदतीला आला. अक्षरनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे.

फलंदाजीमध्ये ऐनवेळी बाद झाला

टी-20 फायनलला अक्षर पटेलला भारतीय संघाने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत प्रमोशन दिलं. भारताने पॉवर प्लेमध्ये एकामागोमाग एक तीन विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहलीला सोबत करण्यासाठी अक्षर पटेलला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तो उत्तम सेट झाला. त्याने विराटबरोबर चांगली पार्टरनशीप केली आता अक्षर आणि विराटच्या जोरावर भारत अधिक पडझड होऊ न देता मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत असतानाच तो 47 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाला. त्यावेळेस आपण फार निराश झालो होतो असं अक्षरने नंतर मुलाखतीत सांगितलं. तेव्हा आपल्याला बुमराहने आधार देत समजावल्याचंही तो म्हणाला.

त्या ओव्हरमध्ये पटेलच्या गोलंदाजीवर कुटल्या 24 धावा

गोलंदाजी करताना सामन्यातील 15 वी ओव्हर अक्षर पटेलने टाकली. या ओव्हरमध्ये कार्ल्सनने त्याची चांगलीच धुलाई केली. कार्ल्सनने या ओव्हर तब्बल 24 धावा कुटल्या. यामध्ये दोन षटकार, दोन चौकारांचा समावेश होता. या महागड्या ओव्हरमुळे भारतीय प्रेक्षकांनाही आता सामना आणि वर्ल्ड कपही हातून गेला असं वाटलं होतं. याच ओव्हरमुळे दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचं गणित 30 बॉल 30 रन इतकं सरळ झालं होतं. ही महागडी ओव्हर टाकल्यानंतर अक्षरलाही 'सारं काही संपलं' असं वाटलं. त्यावेळेस कर्णधार रोहित शर्मा त्याच्याजवळ येऊन, 'सामना अजून संपलेला नाही,' असं म्हणता. या शब्दांनी आपल्याला खूप बळ दिल्याचं अक्षरने सांगितलं. 

नक्की वाचा >> अजिंक्य रहाणेला म्हाडाची तब्बल 10 कोटींची 'लॉटरी'; थेट BCCI चा हस्तक्षेप! 'ती' प्रॉपर्टी चर्चेत

ओव्हरदरम्यान काय म्हणाला रोहित?

"हेन्री कार्लसनने माझ्याविरुद्ध आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्यानंतर रोहित माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला चालेल हरकत नाही. तू तुझी सर्वोत्तम गोलंदाजी कर. त्याने चांगला फटका मारला तर तू फार काही करु शकत नाही. तू फक्त पुढच्या बॉलवर लक्ष दे," असा सल्ला ओव्हर सुरु असताना रोहितने दिल्याचं अक्षर सांगितलं.

 

नक्की वाचा >> 'मी अजून काय करणं अपेक्षित आहे? मी कधीच...', कोहलीवर भडकला मोहम्मद शमी; म्हणाला, 'तुम्ही मला..'

ती ओव्हर संपल्यानंतर पहिली पाच सेकंद...

"ती ओव्हर संपल्यानंतर पहिली पाच सेकंद मला वाटलं की आता सारं काही संपलं. मी निराश झालो होतो. मात्र मला कुठेतरी असं वाटत होतं की भारत सामना फिरवू शकतो. त्यावेळेस रोहित भाई माझ्याजवळ आला माझ्या पाठीवर थाप मारुन म्हणाला, 'उत्तम, काळजी करु नकोस.' तसेच मला निराश पाहून रोहितने, 'मैच खत्म नहीं हुआ है|' असं म्हणत प्रोत्साहन दिलं. दोन संघाची मालिका असते तेव्हा तुमच्या गोलंदाजीवर फटकेबाजी झाल्यास तुमचे खांदे गळून पडतात. तुमच्या देहबोलीवरुन तुम्ही स्पर्धा करायचं सोडून दिल्याचं आणि तुमचं अवसान गळून पडल्याचं दिसतं. मात्र या सामन्यात आम्ही कोणीच पराभव स्वीकारायला तयार नव्हतो. आम्हाला हा सामना 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलपर्यंत न्यायचा होता," असं अक्षर 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

नक्की वाचा >> 'आमच्यातील वादाचा परिणाम...'; गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर विराटने BCCI ला स्पष्ट शब्दात सांगितलं

गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला

जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांनी उत्तम गोलंदाजी करत हा सामना भारताला जिंकवून दिला. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला केवळ एक चौकार मारता आला. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकून 17 वर्षानंतर टी-20 चा वर्ल्ड कप जिंकला.