Harmanpreet Kaur : विकेट्सवर बॅट आदळणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC केली मोठी कारवाई

Harmanpreet Kaur : रागाच्या भरात कौरने बॅट विकेट्सवर आदळली. इतकंच नव्हे तर तिने सामना संपल्यानंतरही त्याने पंचांकडे तक्रार केली. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 23, 2023, 06:23 PM IST
Harmanpreet Kaur : विकेट्सवर बॅट आदळणं हरमनप्रीतला पडलं महागात; ICC केली मोठी कारवाई title=

Harmanpreet Kaur : भारतीय महिला टीम विरूद्ध बांग्लादेश ( BAN W vs IND W ) यांच्यातील सिरीज अखेर बरोबरीत सुटली. यावेळी शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळवण्यात आलेला सामना फार वादग्रस्त ठरल्याचा दिसून आलं. या वादाचा केंद्रबिंदू ठरली ती टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ). दरम्यान हरमनप्रीतच्या या वागणूकीवर तिच्यावर आयसीसीकडून दंड ठोठावण्यात आलाय. 

बांग्लादेशविरूद्ध झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात वनडे सामन्यात हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) टीम इंडियाच्या 34 व्या ओव्हरमध्ये 14 रन्सवर फलंदाजी करत होती. यावेळी बांग्लादेशकडून गोलंदाजी नाहिदा अक्तार करत होती. हरमनप्रीत कौरला ( Harmanpreet Kaur ) ओव्हरचा चौथा बॉल मिड-विकेटच्या दिशेने खेळायचा होता पण हा बॉल शॉर्ट मिड-विकेटवर उभ्या असलेल्या फहिमा खातूनच्या हातात गेला. 

बांग्लादेशाच्या अपीलनंतर अंपायर्सने हरमनप्रीत कौरला ( Harmanpreet Kaur ) आऊट करार दिला. या निर्णयावर भारतीय कर्णधार चांगलीच संतापली. हरमनप्रीतच्या ( Harmanpreet Kaur ) मते बॉल तिच्या बॅटला लागला नाही. यावेळी  रागाच्या भरात कौरने बॅट विकेट्सवर आदळली. इतकंच नव्हे तर तिने सामना संपल्यानंतरही त्याने पंचांकडे तक्रार केली. दरम्यान तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

आयसीसीकडून मोठी कारवाई

क्रिकबझच्या ने दिलेल्या माहितीनुसार, हरमनप्रीत कौरने ( Harmanpreet Kaur ) अंपायर तनवीर अहमद यांच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर आयसीसीने कठोर कारवाई केलीये. यावेळी शिस्तपालन समितीने हरमनप्रीत कौरला तिच्या गैरवर्तनासाठी मॅच फीच्या 75 टक्के दंड आणि 3 डिमेरिट गुण जोडण्याचा निर्णय घेतलाय. 

याशिवाय बॅटने स्टंप्सला मारण्याच्या कृत्यावर मॅच फीच्या 50% पैसे कापण्यात आलेत. तसंच अंपायरवर जाहीरपणे टीका केल्याबद्दल 25% कपात करण्यात आलंय. त्यामुळे एकंदरीत हे प्रकरणं हरमनप्रीत कौरला चांगलंच महागात पडल्याचं दिसून येतंय. 

ट्रॉफीसोबत फोटो काढताना देखील गोंधळ

ही सिरीज ड्रॉ झाल्याने बांगलादेश आणि भारतीय टीमने ट्रॉपी वाटून घेतली. यावेळी कपबरोबर फोटो काढताना हरमनप्रीतने ( Harmanpreet Kaur ) ओरडूनच, "पंचांनाही खेळाडूंबरोबर उभं करा. त्यांच्याशिवाय तुम्ही काहीच करु शकत नाही," असं म्हणाली. यावेळी तिचा रोख हा बांगलादेशच्या महिला संघाकडे असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान तिचं हे कृत्य पाहून बांगलादेशची कर्णधार निगर सुल्तानाने सर्व संघ सहकाऱ्यांना तिथून उठण्याचा इशारा केला. बांगलादेशची टीम फोटो न काढताच निघून गेली.