शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या

श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे. 

Updated: Aug 13, 2017, 05:07 PM IST
शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या title=

नवी दिल्ली : श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे. 

श्रीलंकेविरोधातील तिसऱ्या टेस्टमध्ये हार्दिक पांड्याने मोठा कारनामा केला आहे. पांड्याने ९६ बॉलमध्ये ७ सिक्स आणि ८ फोरसह १०८ रन बनवले आहे. त्याने एकाच ओव्हरमध्ये २६ रन केले आहे. जे टेस्ट मॅचमध्ये भारताकडून कपिल देव यांनी २७ वर्षापूर्वी केलं होतं. १९९० मध्ये कपिल देव यांनी एक ओव्हरमध्ये २४ रन केले होते.

पांड्याने टेस्टमध्ये एका ओव्हरमध्ये तीन सिक्स मारत महेंद्र सिंह धोनीची बरोबरी देखील केली आहे. कपिल देव यांनी एका ओव्हरमध्ये लागोपाठ ४ सिक्स मारल्य़ाचा रेकॉर्ड बनवला आहे.