5 कोटी रुपये किंमतीच्या जप्त घड्याळांवर हार्दिक पांड्या याची पहिली प्रतिक्रीया

Hardik Pandya Watches : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडून जप्त केलेल्या घड्याळांबाबत त्यांने स्पष्टीकरण दिले आहे.  

Updated: Nov 16, 2021, 11:14 AM IST
5 कोटी रुपये किंमतीच्या जप्त घड्याळांवर हार्दिक पांड्या याची पहिली प्रतिक्रीया title=

मुंबई : Hardik Pandya Watches : टीम इंडियाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्याकडून जप्त केलेल्या घड्याळांबाबत त्यांने स्पष्टीकरण दिले आहे. या घड्याळांची किंमत पाच कोटी नाही. ही खरेदी कायदेशीर आहे, असे तो म्हणाला.

युएईमध्ये आयसीस T-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊन भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्यावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केल्याचे समोर आले होते. रविवारी रात्री पांड्या याच्याकडून दोन महागडी घड्याळे कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केली. मुंबई विमानतळावर पांड्या यांच्या जवळ सापडेलेल्या घड्याळांबाबत विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. (Patek Philippe Nautilus Platinum 5711) हार्दिक पांड्या घड्याळांचे बिलही दाखवू शकला नाही, त्यानंतर विभागाने दोन्ही घड्याळे जप्त केली.  दोन्ही मनगटाच्या घड्याळांची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होती. त्यानंतर आता हार्दिक पांड्या याने स्वतः याबाबत खुलासा केला आहे. या घड्याळांची किंमत पाच कोटी नाही तर दीड कोटी आहे. ही खरेदी कायदेशीर आहे, असे तो म्हणाला.

दरम्यान, टीम इंडियाच्या हार्दिक पांड्या याने ट्विटरवर यांदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्यावर झालेल्या कारवाईबाबत त्याने खुलासा केला आहे. 15 नोव्हेंबरला माझे सामान घेऊन सोमवारी सकाळी दुबईहून आल्यावर, मी स्वेच्छेने मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर आणले. हे सामान घोषित करण्यासाठी आणि आवश्यक कस्टम ड्युटी भरण्यासाठी गेलो होतो. मुंबई विमानतळावरील कस्टम्सबद्दल माझ्याबाबत सोशल मीडियावर गैरसमज पसरले आहेत.  काय झाले ते मी स्पष्ट करू इच्छितो, असे ट्विट कताना म्हटलेय.