मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या 37व्या वाढदिवशी आलराउंडर हार्दिक पंड्याने एक खूपच खास गिफ्ट त्याला दिलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आहे ते खास गिफ्ट... तर आपल्या हेअर स्टाईलसाठी चर्चेत असणाऱ्या हार्दिक पंड्याने स्वत: त्याच्या हाताने धोनीचे केस कापून हेअर स्टाईल केली आहे.
हार्दिक पंड्याने शनिवारी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो धोनीचे केस कापतांना दिसत आहे. त्याने म्हटलं आहे की 'विशेष दिवशी विशेष हेअर कट' माहीला माझं बर्थडे गिफ्ट. हा स्टंट जाणकाराच्या द्वारे करण्यात आला आहे. घरी करण्याचा प्रयत्न करु नका.
भारतीय टीमचा विकेटकीपर महेंद्र सिंह धोनी देखील त्याच्या केसांमुळे नेहमी चर्चेत असतो. सुरुवातीला तो खूप मोठे केस ठेवायचा. पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यङ परवेज मुशर्रफ यांनी देखील त्याच्या केसांचं कौतूक केलं होतं आणि त्याला केसं कापू नको असं म्हटलं होतं. पण 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने केसं कापले होते.