मुंबई : इंडियाचा हुकूमी एक्का असलेला बॉलर हार्दिक पांड्याने आपल्या टीकाकारांना खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. गेल्या दोन वर्षात पांड्याच्या करिअरचा ग्राफ उंचावतच चालला आहे.
तुफानी बॅटिंग करण्यासाठी त्याला वरच्या क्रमाकांवर पाठविण्याचे धाडसही टीमने दाखविले. आपल्यावरचा विश्वास पांड्याने खरा करुन दाखविला.
श्रीलंका दौऱ्यात पांड्याला विश्रांती देण्यासंबधी त्याला विचारले असता जेव्हापासून मी टीममध्ये आलोय, विश्रांती घेतली नाही असे उत्तर त्याने दिले.
एक क्रिकेटपटू कधीच विश्रांती घेत नाही, विश्रांतीच्या वेळात तो सरावासाठी जातो व तंदुरुस्त होतो.
पांड्याला त्याच्या आवडत्या खेळाडूबद्दल विचारले असता, जराही वेळ न घालविता त्याने वसीम जाफरचे नाव घेतले. 'मी त्यांच्याप्रमाणेच खेळतो, असे त्याने सांगितले.
उद्धट असल्याची त्याच्यावर टीका केली जाते यावर बोलणे हे लोकांचे काम आहे असे तो उत्तरतो. न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक बोलत होता.
हार्दिकला मुंबई इंडियन्सच्या संघातून खेळायला आवडत नाही असे म्हटले जात होते. पण त्यावरही त्याने उत्तर दिले. मुंबई इंडियन्स माझ्यासाठी एक कुटुंब आहे.
आयपीएलमध्ये मुंबईसाठी खेळणे माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे असे पांड्याने सांगितले.