Hardik Pandya : पांड्याला कोणत्या गोष्टीचा गर्व? थेट धोनीशी तुलना करत म्हणाला...

Hardik Pandya on MS Dhoni : मला नेहमीच सिक्स मारण्यात मजा येते. पण हा आक्रमक खेळ आता मला सर्वच ठिकाणी खेळून चालणार नाही, असंही पांड्या (Hardik Pandya) म्हणालाय.

Updated: Feb 2, 2023, 04:58 PM IST
Hardik Pandya : पांड्याला कोणत्या गोष्टीचा गर्व? थेट धोनीशी तुलना करत म्हणाला... title=
MS Dhoni, Hardik Pandya

Hardik Pandya Evolution : भारत आणि न्यूझीलंड (IND VS NZ T20I) यांच्यात खेळलेल्या गेलेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडला टी-ट्वेंटीमध्ये 168 धावांनी लोळवण्याचा पराक्रमक भारतीय संघाने (IND vs NZ 3rd T20I) केला आहे. मालिकेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कॅप्टन हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील देण्यात आला. त्यानंतर आता एक सिरीज काय जिंकली पांड्या गर्विष्ठ झाल्याची टीका होऊ लागली आहे. (Hardik Pandya evolution I don't mind coming in and playing the MS Dhoni role after IND vs NZ 3rd T20I)

काय म्हणाला पांड्या (Hardik Pandya)?

मला दुसऱ्या प्रकारे जबाबदारी घेयची आहे. हुशारी दाखवण्यावर माझा विश्वास आहे. मी माझ्या संघाला विश्वास दाखवून देतो की, कुणी नसेल तर मी त्याठिकाणी उभा आहे. मला प्रत्येकवेळी मग कोणतीही परिस्थिती असो टीममध्ये शांतता राखवी लागणार आहे, असं पांड्या (Hardik Pandya) म्हणतो. धोनीवर (MS Dhoni) बोलताना पांड्या म्हणतो की...

मला वाटतंय मला माझा स्टाईक रेट कमी करण्याचं आव्हान असो किंवा अन् कोणतं आव्हान असो. त्याप्रकारचे बदल माझ्यात दिसत आहेत. या प्रकारची भूमिका साकारण्यासाठी मला कोणताहा प्रॉब्लेम नाही, जसं धोनी (MS Dhoni) असताना करत होता, असं पांड्या (Hardik Pandya) म्हणाला आहे. मला नेहमीच षटकार मारण्यात मजा येते. पण हा आक्रमक खेळ आता मला सर्वच ठिकाणी खेळून चालणार नाही, असंही तो म्हणालाय.

आणखी वाचा - "लेका जेव्हा तू U19 खेळत होतास, तेव्हा तुझा बाप...", Pakistan च्या खेळाडूचं Virat Kohli बद्दल धक्कादायक विधान

दरम्यान, हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ज्यावेळी गुजरात टायटन्सची (GT) कॅप्टन्सी केली. त्यावेळी त्याच्या शांत स्वभावाचं कौतूक केलं जातं होतं. हा शांतपणा जपण्याची सवय मला धोनीकडून (Mahendra Singh Dhoni) लागली, असं पांड्या म्हणाला होता. त्यानंतर आता टीम इंडियाची (Team India) सुत्र हातात घेतल्यानंतर पांड्या पुन्हा धोनी होऊ पाहतोय का?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.