महिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका

 भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली.

Updated: Jan 8, 2019, 02:06 PM IST
महिलांचा आदर कर, 'सेक्स लाईफ'वरून हार्दिक पांड्यावर चौफेर टीका title=

मुंबई : भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी 'कॉफी विथ करण' या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये दोघांनी क्रिकेट व्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. पण वैयक्तिक आयुष्यावर केलेल्या वक्तव्यामुळे हार्दिक पांड्यावर महिलांकडून जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या या शोमध्ये हार्दिक पांड्यानं त्याच्या सेक्स लाईफवर भाष्य केलं. माझ्या सेक्स लाईफबद्दल माझ्या कुटुंबाला काहीच आक्षेप नसल्याचं हार्दिक पांड्या म्हणाला. कुटुंबासोबत पार्टीला गेलो असताना त्यांनी मला यातल्या कोणत्या मुलीबरोबर 'सिन' केला आहेस, असा प्रश्न विचारला. तेव्हा हिच्याबरोबर, हिच्याबरोबर आणि तिच्याबरोबर, असं उत्तर मी कुटुंबाला दिल्याचं पांड्यानं सांगितलं. असं असलं तरी माझ्या कुटुंबाला माझा अभिमान आहे, असं पांड्या या मुलाखतीमध्ये म्हणाला.

एवढच नाही तर आपण पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर व्हर्जिनिटी गमावल्याचंही कुटुंबाला येऊन सांगितल्याचं वक्तव्य हार्दिक पांड्यानं केलं. 'आज मे कर के आया' हे मी कुटुंबाला पहिल्यांदा सेक्स करून आल्यानंतर सांगितल्याचं हार्दिक म्हणाला.

नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर तू मुलींना त्यांचं नाव का विचारत नाही? असा प्रश्न करण जोहरनं हार्दिकला विचारला. तेव्हा मला मुली कशा नाचतात हे पाहायला आणि निरिक्षण करायला आवडतं, असं उत्तर हार्दिक पांड्यानं दिलं.

हार्दिक पांड्यावर नेटकऱ्यांची टीका

या मुलाखतीनंतर हार्दिक पांड्यावर सोशल नेटवर्किंगवर चौफेर टीका होत आहे. हार्दिक पांड्यानं यातून महिलांचा अपमान केला आहे. त्याला महिलांचा आदर करणं शिकवण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त होत आहेत.

सचिनपेक्षा विराट चांगला

याच मुलाखतीमध्ये करण जोहरनं सचिन तेंडुलकर का विराट कोहली चांगला? हा प्रश्न विचारला. यावर हार्दिक पांड्या आणि केएल राहुलनं विराट कोहली हे उत्तर दिल्यामुळेही दोघांवर टीका होत आहे. या दोघांनी उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर व्यक्त होत आहेत. खुद्द विराट कोहली हा सचिनला त्याचा मेंटर मानतो. अनेक वेळा अडचणीच्या वेळी विराट सचिनशी चर्चा करतो. तसंच दबावामध्ये कसं खेळायचं हे सचिनशिवाय कोणीच सांगू शकत नाही, असंही विराट नेहमी म्हणतो.