मुंबई : 2020-21 ला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी फार चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी 4 टेस्ट सामने खेळण्यात आले होते. पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची दाणादण उडवत दुसऱ्या डावात अवघ्या 36 रन्समध्ये टीम इंडियाला ऑलआऊट करत सामना जिंकला. इतक्या दारूण पराभवानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता.
दरम्यान या नुकतंच या टेस्ट सिरीजवर एक डॉक्युमेंट्री रिलीज करण्यात आली आहे. 'बंदो मे था दम' असं या डॉक्युमेंट्रीचं नाव असून ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज जिंकवण्यात ज्या खेळाडूंचा मोलाचा वाटा होता त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने टीम इंडियाच्या काही खास खेळाडूंना स्वार्थी म्हणून संबोधलं होतं.
या सिरीजदरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते. जिथे खाण्यासासाठी गेले असता मस्ती करताना कॅमेरात कॅमेरात कैद झाले होते.
केवळ हॉटेलमध्ये खाण्यासाठी कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा करत टीम पेनने या खेळाडूंना स्वार्थी म्हटलं होतं. दरम्यान ही घटना नेमकी काय होती याचा खुलासा तत्कालीन कर्णदार अजिंक्य रहाणेने केलाय.
या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, "बायो बबलचा नियम तोडण्याचा आरोप या खेळाडूंवर लावण्यात आला होता. ज्या खेळाडूंचा फोटो समोर आला होता, ते हॉटेलमध्ये खाणं आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी वातावरण योग्य नसल्याने या खेळाडूंना हॉटेलमध्ये बसणं भाग होतं. त्यामुळे बातम्यांद्वारे जे काही दाखवण्यात आलं होतं, ते पूर्णपणे चुकीचं होतं."
दरम्यान टीम पेन म्हणाला होता, "त्या चार-पाच खेळाडूंनी संपूर्ण कसोटी मालिका धोक्यात आणली. कशासाठी? चिप्सच्या एका पाकिटासाठी ते कुठेही गेले. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ते मला स्वार्थी वाटलं."