स्विमिंग पुलमध्ये हार्दिक पांड्याचा रोमॅंटीक अंदाज, फोटोची चर्चा

 इंस्टाग्रामवर रोमँटिक फोटो शेअर

Updated: Mar 27, 2021, 01:56 PM IST
स्विमिंग पुलमध्ये हार्दिक पांड्याचा रोमॅंटीक अंदाज, फोटोची चर्चा title=

मुंबई : टीम इंडियाची स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि पार्टनर नताशा स्टॅनकोव्हिक( Natasa Stankovic) सोशल मीडियावर खूप एक्टीव्ह असतात. नताशा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नताशा स्टॅनकोविचने नुकताच इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केलाय. ज्यात ती हार्दिक पांड्यासोबत स्विमिंग पूलमध्ये पोझ देताना दिसतेय. हे फोटो पाहून पांड्याचे फॉलोवर्स लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसतंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic)

या फोटोमध्ये नताशा हार्दिक पांड्याला किस करताना दिसतेय. नताशा स्टॅनकोविचने कॅप्शनमध्ये 'माय सनशाय हार्दिक पंड्या.' असे लिहिले आहे. इंस्टाग्रामवर हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिचा रोमॅंटीक फोटो सर्वांनाच आवडतोय. क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची जोडीदार नताशा स्टॅनकोव्हिक चर्चेत राहणारे जोडपे आहे.

पांडया भिडला !

भारताच्या फलंदाजीच्या 46 व्या ओव्हरदरम्यान सॅम कुरनच्या एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले होते. या तीनपैकी दोन षटकार हार्दिक पांड्याने ठोकले होते. शेवटच्या बॉलवर हार्दिकने पुन्हा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने तो चेंडू चुकविला. बॉल रिकामा गेला. कुरनने हार्दिकला काहीतरी म्हटले, त्यानंतर हार्दिकनेही त्याला उत्तर दिले. दरम्यान, पंचला मध्यभागी येऊन बचाव करावा लागला.

पहिल्या वनडे सामन्यातही भारताच्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टॉम कुरनने कृणाल पांड्याला काहीतरी म्हटले होते. त्यानंतर क्रुणाल देखील टॉमवर चिडला होता. या दोघांमधील वाढता वादविवाद पाहता, मैदानावरील पंचांना या दोन्ही खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली होती.