India vs England 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा जखमी झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. अशातच बीसीसीआयने बदली खेळाडूंची नावं जाहीर केली असून सर्फराज खान (Sarfaraz Khan), सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीमध्ये कोणाला संधी मिळणार? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे.
काय म्हणतो भज्जी?
'सरफराज खान याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल, कारण विराट कोहली परतल्यावर कोणत्याही एका खेळाडूला संघ सोडावा लागेल, त्यामुळे संधी वाया जाऊ देण्याची रिस्क तो घेऊ शकत नाही, असं हरभजन सिंग याने म्हटलं आहे. (Harbhajan Singh On Sarfaraz Khan)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरफराज खानने खूप मेहनत केली आहे आणि खूप धावा केल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात दोन अनकॅप्ड फलंदाज आहेत, एक रजत पाटीदार आणि दुसरा सरफराज खान.., असं हरभजन सिंग म्हणतो.
टीम इंडियाला दिला सल्ला
मला वाटतंय की आगामी सामना हा टर्निंग पीचवर खेळवला जाईल. त्यामुळे टीम इंडियाला फिरकी गोलंदाजांवर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्याकडे आश्विन आणि अक्षर आहे. पण वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांना संघात सामील केलं तर टीम इंडिया स्वत:च्या टॅकमध्ये अडकू शकते. चार फिरकीपटू खेळवले तर बॅटिंग युनिट कमकूवत होईल, याची काळजी रोहितने घेतली पाहिजे, असा सल्ला हरभजन सिंगने रोहित शर्माला दिलाय.
दरम्यान, एकीकडे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर चांगलं प्रदर्शन करत नसल्याने दोन्ही खेळाडू तिसऱ्या कसोटीतून बाहेर होण्याची शक्यता आहे. विझाग येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला विराट कोहलीची कमरता नक्की जाणवेल. तर रोहित शर्मा 4 स्पिनर्ससोबत मैदानात उतरेल का? असा सवाल देखील विचारला जातोय.
दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.