धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

Updated: May 26, 2017, 12:46 PM IST
धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग title=

मुंबई : टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

धोनीच्या सध्याच्या फॉर्मवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. धोनीने याच वर्षी वनडे आणि टी-20 चं कर्णधारपद सोडलं. एका चॅनेलशी बोलतांना त्याने म्हटलं की, 'धोनी टीमचा कर्णधार होता. त्यामुळे तो खेळ चांगल्याप्रकारे समजतो. मिडिल ऑर्डरमध्ये त्याची उपस्थिती अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देतो. पण मला वाटतं की, टीम निवडत असतांना धोनीप्रमाणे मला विचारात नाही घेतलं गेलं.