चॅम्पियन्स ट्रॉफीआधी १७५ बॉलमध्ये ठोकले ३२० रन्स

मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींमध्ये यामुळे मॅच कोण जिंकणार याबाबत उत्सूकता आहे. पण यातच पाकिस्तानातून एक बातमी अशी येत आहे की एका क्रिकेटरने ३० ओव्हरमध्ये ३०० रन ठोकले आहेत.

Updated: May 25, 2017, 08:17 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी १७५ बॉलमध्ये ठोकले ३२० रन्स title=

कराची : मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींमध्ये यामुळे मॅच कोण जिंकणार याबाबत उत्सूकता आहे. पण यातच पाकिस्तानातून एक बातमी अशी येत आहे की एका क्रिकेटरने ३० ओव्हरमध्ये ३०० रन ठोकले आहेत.

बिलाल इरशाद अहमद या पाकिस्तानच्या खेळाडूने या कारनामा केला आहे. पाकिस्तानच्या या खेळाडूने इंटर क्लब क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये ही खेळी केली आहे. बिलालने १७५ बॉलमध्ये ३२० रन्स केले आहेत. ज्यामध्ये त्याने ९ सिक्स आणि ४२ फोर मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून हे कोणी केलेलं नाही. पण २०० रनचा टप्पा मात्र गाठला गेला आहे.

रोहित शर्माने श्रीलंकेच्या विरोधात २६६ रनची खेळी केली होती. या लिस्टमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, क्रिस गेल आणि मार्टिन गप्टिल यांचा देखील समावेश आहे.