मुंबई : भारताचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवाग आता 43 वर्षांचा झाला आहे. सेहवागच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. स्टेनने सेहवागचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडूला कट करताना दिसतोय.
स्टेनने घरातील धारदार चाकूची उपमा यावेळी सेहवागला दिली आहे. सर्वात धारदार चाकूचं नाव वीरू आहे, कारण तो सर्व काही कापू शकतो. स्टेन सेहवागच्या कट शॉटचं कौतुक करत होता, कारण सेहवाग ऑफ स्टंपच्या बाहेर प्रत्येक चेंडूवर सहजपणे कट शॉट खेळायचा. लोकांना सेहवागचा अपर कट शॉट देखील खूप लोकप्रिय होता.
डेल स्टेन व्यतिरीक्त वसीम जाफर तसंच भारतीय क्रिकेट बोर्ड आणि चेन्नई सुपर किंग्ज संघानेही सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या व्यक्तींनी सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
My sharpest knife back home is nicknamed Viru, cuts anything!
Happy birthday pal!
Have a great one @virendersehwag pic.twitter.com/jyVE93ZLzD— Dale Steyn (@DaleSteyn62) October 20, 2021
एक स्फोटक सलामीवीर म्हणून ओळख होती. सेहवाग ऑफ-स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंवर आणि बाउंसर चेंडूंवर उत्कृष्ट कट शॉट्स आणि अपर कट शॉट्स मारायचे.