अरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....

फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या... 

सायली पाटील | Updated: Jun 24, 2023, 03:02 PM IST
अरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे .... title=
happy birthday lionel messi once argentinas star footballer got stuck in toilet

Lionel Messi Birthday : फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या... 

बालपणापासूनच चर्चा मेस्सीच्या फुटबॉलमधील जादूची... 

लहानपणापासूनच मेस्सीने या खेळात त्याची किमया दाखवली. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची म्हणजेच मेस्सी लहान असतानाची गोष्ट, जेव्हा त्यानं फुटबॉलच्या एका स्पर्धेत सहभाग घेतला होता. पण, तिथं सामना सुरु होण्यााधी भलतीच अडचण आली. कारण, मेस्सी टॉयलेटमध्ये अडकून पडला होता. टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्यानं त्याला बाहेर पडता येईना शक्य नव्हतं. इथे आतमध्ये त्याचा भलताच संघर्ष सुरु असताना तिथं त्याच्या संघाचा सामना सुरु होऊन विदुसरीकडे मेस्सीच्या टीमचा सामना सुरु झाला आणि समोरच्या टीमने एक गोलही केला होता.

वेळ पुढे जात होता आणि मेस्सी बेचैन होत होता. अखेर काही वेळाने टॉयलेटची खिडकी फोडून तो कसाबसा बाहेर पडला आणि तातडीने मैदानात पोहोचला. तोपर्यंत सामन्याचा हाफ टाईम झाला होता. दुसऱ्या हाफ टाईम मेस्सीने मैदानात उतरण्याचं ठरवलं आणि सामन्याच्या अखेरच्या क्षणांत 3-1 अशा फरकानं संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या उत्तरार्धांत हॅटट्रीक मारत मेस्सीने संघाला विजय मिळवून दिला होता.

हेसुद्धा वाचा : पाऊस खरंच आनंद देतो? मानसिक आरोग्याशी संबंधित हे गुपित डोकं चक्रावेल 

 

अशा पद्धतीने मेस्सीच्या खेळाची जादू त्या क्षणापासून सुरुच राहिली. त्यानंतर प्रसिद्ध फुटबॉल क्लब बार्सिलोनामध्ये मेस्सीची निवड झाली. तर 2005 मध्ये मेस्सीने अर्जेंटिना संघातून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं.  राखीव खेळाडू म्हणून  म्हणून मेस्सी मैदानात आला आणि अवघ्या 47  सेकंदात त्याला माघारी परतावं लागलं होतं. पहिल्याच सामन्यात मेस्सीला रेड कार्ड मिळालं होतं. पण, ये चढ उतार मागे टाकत आज हाच मेस्सी या क्रीडा प्रकारावर राज्य करतोय हे मात्र नाकारता येणार नाही.