मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) 29 सामन्यांच्या यशस्वी आयोजनानंतर कोरोनामुळे उर्वरित हंगाम स्थगित करावा लागला. त्यानंतर आता बीसीसीआयने आज (29 मे) झालेल्या बैठकीत उर्वरित सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये (UAE) करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन याबाबतची माहिती दिली. त्यानुसार उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करण्यात आले आहे. या सामन्यांचे आयोजन झाले नसते तर, बीसीसीआयला (BCCI) आर्थिक फटका बसला असता. बीसीसीआयला तब्बल 2 हजार 500 कोटींचं आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. (Had the remaining 31 matches of the 14th season of the IPL not been played BCCI have lost Rs 2500 crore)
NEWS : BCCI to conduct remaining matches of VIVO IPL in UAE.
More details here - https://t.co/r7TSIKLUdM #VIVOIPL pic.twitter.com/q3hKsw0lkb
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2021
एकूण 60 पैकी 31 सामने उर्वरित
या 14 व्या मोसमात विविध 6 शहरांमध्ये 60 सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र 2 मेपर्यंत यशस्वीरित्या 29 सामने खेळवण्यात आले. त्यानंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. दरम्यान आता हे 31 सामने यूएईत खेळवण्यात येणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. पण, अजूनही या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. सूत्रांनुसार या उर्वरित हंगामाचे आयोजन हे 18 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येऊ शकते.
दरम्यान या उर्वरित हंगामामध्ये एकूण 30 परदेशी खेळाडूंना सहभागी होता येणार नाहीये. यामध्ये कांगारुंच्या 18 आणि 12 इंग्लिश खेळाडूंचा सहभाग आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत आधीच स्पष्ट संकेत दिले होते. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलच्या दरम्यान इतर काही मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेता येणार नाही.
सोबतच ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही पुढील काही महिन्यांमध्ये काही सीरिज खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाला आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या आधी 3-4 सीरिज खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलिया बांगलादेश विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना बायो बबलमध्ये रहावे लागते. या दरम्यान खेळा़डूंना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही सहभागी होऊ शकणार नाहीत.