GT vs MI | इशान-रोहितची शानदार खेळी, डेव्हिडचा धमाका, गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले.    

Updated: May 6, 2022, 09:37 PM IST
GT vs  MI | इशान-रोहितची शानदार खेळी, डेव्हिडचा धमाका, गुजरातला विजयासाठी 178 रन्सचं आव्हान title=

मुंबई : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. कॅप्टन रोहित शर्माने 43 धावा जोडल्या. तर अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत टीम डेव्हिडने महत्तवपूर्ण  44 धावा कुटल्या. डेव्हिडने केलेल्या या फटकेबाजीमुळे मुंबईला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. (gt vs mi ipl 2022 mumbai indians set 178 runs target for gujrat titans) 

तिलक वर्माने 21 रन्स केल्या. सूर्यकुमार यादव 13 धावा करुन माघारी परतला. तर कायरन पोलार्डने पुन्हा निराशा केली.  पोलार्डने  4 रन्स केल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.  तर प्रदीप सांगवन, अल्झारी जोसेफ आणि लॉकी फर्ग्यूसन या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सैम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.

गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.