GT vs KKR : हायव्होल्टेज सामन्यात केकेआरचा दणक्यात विजय; रिंकू सिंगने आस्मान दाखवलं!

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders: गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) यांच्यात खेळल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात केकेआरचा दणक्यात विजय मिळवला आहे. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंह (rinku singh) यांने अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातच्या गोलंदाजाला आस्मान दाखवलं. 

सौरभ तळेकर | Updated: Apr 9, 2023, 07:45 PM IST
GT vs KKR : हायव्होल्टेज सामन्यात केकेआरचा दणक्यात विजय; रिंकू सिंगने आस्मान दाखवलं! title=
rinku singh GT vs KKR IPL 2023

GT vs KKR, IPL 2023 : गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळल्या गेलेल्या हायव्होल्टेज सामन्यात केकेआरचा (KKR) दणक्यात विजय मिळवला आहे. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंह (Rinku Singh) यांने अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरातच्या गोलंदाजाला आस्मान दाखवलं. अखेरच्या ओव्हरला 29 धावांची गरज होती. त्यावेळी अखेरच्या ओव्हरमध्ये त्याने 5 सिक्स घेचले आणि अनपेक्षित विजय मिळवला आहे.  (GT vs KKR IPL 2023 Kolkata Knight Riders beat Gujarat Titans rinku singh fire at last over)

गुजरात टायटन्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ४ ओव्हर गुजरातसाठी चांगल्या गेल्या पण गुजरातला चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला पहिला धक्का बसला. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर ऋद्धिमान साहा १७ रन्सकरून माघारी परतला, त्यानंतर साई सुदर्शन आणि शुभमं गिलने फलंदाजीची धुरा सांभाळी त्यांचा जोडीने ५० धावांची पार्टनरशिप केली पण गुजरातला ११व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला दुसरा धक्का शुभम गिल बाद झाला हा धक्का सुद्धा गुजरातला सुनील नारायणकडून मिळेला.

सुनील नारायणची ही दुसरी विकेट होती. त्यानंतर अभिनव मनोहरने आल्या आल्या फटकेबाजी सुरु केली पण त्याला १४ रन्स करून माघारी परतावं लागला. त्याने ८ बॉल्समध्ये ३ चौकार ठोकले. त्यानंतर साई सुदर्शन आणि विजय शंकर ने फलंदाजीची धुरा सांभाळी विजय शंकर आणि साई सुदर्शनने जोरदार फलंदाजी केली पण साई सुदर्शन १७ व्या ओव्हरला सुनील नारायणच्या गोलंदाजीवर विकेट गमावली. त्यानंतर विजय शंकरने कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना २३ बॉल्समध्ये ६३ रन्स ठोकले आणि कोलकाता नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी २०४ रन्स बनवून २०५ रन्सचं आव्हान दिलं.

गुजरातने दिलेल्या 205 धावांचं आव्हान पार करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. गुरबाज आणि जगदिशन झटपट बाद झाले. त्यानंतर व्यंकटेश अय्यर याने धुंवाधार खेळी केली. नितीश राणा याने देखीलस अय्यरला चांगली साथ दिली. नितीश राणा 45 धावा करत बाद झाला. त्यानंतर अय्यरने 8 फोर आणि 5 सिक्स खेचत 83 धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर मैदानात आला तो रिंकू सिंह, सुरूवातीला बेदानं खेळत असलेल्या रिंकूने अखेरच्या ओव्हरला रंग दाखवले. 

दरम्यान, अखेरच्या ओव्हरला कोलकाताला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंह स्टाईकवर होता. या ओव्हरमध्ये त्याने पाच सिक्स खेचले आणि सामना कोलकाताच्या पारड्यात फिरवला. थरारक रंगलेल्या या सामन्यात अखेरच्या बॉलपर्यंत सर्वांच्या नजरा रिंकूवर होत्या. त्यामुळे कोलकाताने गुजरातवर 3 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे.