Harmanpreet Kaur च्या हक्कासाठी युवराज सिंहचा पुढाकार; गूगल सर्चची 'ही' गोष्ट सुधारणार

टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री करून हरमनप्रीत एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj singh) एक गोष्ट समोर आणली आहे. युवराजने हरमनप्रीतसाठी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे. 

Updated: Feb 22, 2023, 09:39 PM IST
Harmanpreet Kaur च्या हक्कासाठी युवराज सिंहचा पुढाकार; गूगल सर्चची 'ही' गोष्ट सुधारणार title=

Harmanpreet Kaur : एकीकडे भारतीय महिला क्रिकेट टीमची (Womens cricket Team) कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) नवनवीन रेकॉर्ड बनवतेय. नुकतंच सोमवारी 150 टी-20 इंटरनॅशनल खेळणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटर बनली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची एन्ट्री करून हरमनप्रीत एक नवा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र असं असतानाच टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंहने (Yuvraj singh) एक गोष्ट समोर आणली आहे. युवराजने हरमनप्रीतसाठी एक अनोखी मोहीम सुरु केली आहे. 

गुगल सर्चवर दिसत नाही कर्णधार हरमनप्रीत कौर

युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये असं दिसतंय की, ज्यावेळी गुगलवर 'इंडियन क्रिकेट टीम कॅप्टन' असे शब्द सर्च केल्यानंतर केवळ रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांचे फोटो दिसतात. मात्र यामध्ये महिला क्रिकेट टीमची कर्णधार हरमननप्रीत कौर हिचा नाव किंवा फोटो दिसत नाही. 

ही समस्या शोधून युवराजने याबाबतल ट्विट केलं आहे. युवराज त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, जर आम्ही ही समस्या निर्माण केली आहे तर, ही समस्या फिक्स करण्याची देखील आमच्यामध्ये ताकद आहे. चला महिला क्रिकेटसाठी हे करूया. या हॅशटॅगचा वापर करा.  

#IndianCricketTeamCaptainHarmanpreetKaur 

सुरेश रैनानेही शेअर केला व्हिडीओ

माजी फलंदाज सुरेश रैनाने देखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी रैनाने या मोहिमेत सहभागी झाल्याचं म्हणत, इतरांनाही आवाहन केलं आहे.

टीम इंडियाची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक

सोमवारी आयर्लंड विरूद्ध झालेला सामना पावसामुळे अर्धाच झाला. त्यामुळे डकवर्थ लूईस नियमानुसार निकाल लागला.टीम इंडियाने डकवर्थ लूईस नियमानुसार (duckworth lewis method) आयर्लंडचा 5 धावांनी पराभव करत सेमी फायनल गाठली.