गौतम गंभीरनं सांगितलं कधी होणार निवृत्त

गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करतोय.

Updated: Dec 21, 2017, 07:43 PM IST
गौतम गंभीरनं सांगितलं कधी होणार निवृत्त title=

नवी दिल्ली : गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करतोय. गौतम गंभीरच्या चांगल्या फॉर्ममुळेच दिल्लीच्या टीमनं यंदा फायनल गाठली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये रणजी फायनल गाठायची दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे.

रणजी क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यानंतरही गौतम गंभीरची अजूनही भारतीय टीममध्ये निवड झालेली नाही. याबाबत गंभीरनं प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही फक्त रन बनवू शकता. हीच गोष्ट तुमच्या नियंत्रणात असते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकत नाही, असं गंभीर म्हणालाय.

गंभीरच्या वयामुळे रणजी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक होत नाहीये. असं असलं तरी भारतीय टीममध्ये कमबॅक करण्याची आशा गंभीरनं अजूनही सोडलेली नाही. क्रिकेट खेळण्यासाठी जोपर्यंत प्रेरण मिळते तोपर्यंत मी खेळत राहणार. ज्यादिवशी खेळायची प्रेरणा मिळणार नाही, त्यादिवशी मी निवृत्त होईन, अशी प्रतिक्रिया गंभीरनं दिली आहे.

मागच्यावर्षी मी जे करत होतो, तेच आत्ताही करतोय. मी निवड समिती सदस्यांशी बोलत नाही. मला असं करण्याची गरजही नाही. रन्स करणं हेच माझं काम आहे, असं वक्तव्य गंभीरनं केलं आहे.