BCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली लढवणार या अध्यक्षपदाची निवडणूक?

सौरव गांगुली घेणार नवी जबाबदारी. लढवणार ही निवडणूक

Updated: Oct 15, 2022, 10:57 PM IST
BCCI अध्यक्षपद सोडल्यानंतर गांगुली लढवणार या अध्यक्षपदाची निवडणूक? title=

Sourav Ganguly Contest Election of CAB : भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुली बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडणार आहे. त्यांच्या जागी 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेले रॉजर बिन्नी यांना अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र सौरव गांगुलीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवू शकतो.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख होण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. बीसीसीआयनंतर ते बंगालच्या क्रिकेट असोसिएशनकडे वळले आहेत. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर, गांगुली 2015 मध्ये CAB (क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल) चे प्रमुख बनले. त्यानंतर ते चार वर्षे या पदावर राहिले. त्यानंतर ते भारतीय क्रिकेट बोर्डात आले. जगमोहमन दालमिया यांचे पुत्र अभिषेक दालमिया यांनी तीन वर्षांपूर्वी ही जबाबदारी स्वीकारली. आता गांगुली पुन्हा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख बनू शकतात.

आपला कार्यकाळ संपल्यानंतर भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली म्हणाले की, 'तुम्ही आयुष्यात जे काही कराल ते हे उत्तम क्षण होते. मी प्रत्येकाला सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळलात तेव्हाचे सर्वोत्तम दिवस होते. त्यानंतर मी खूप काही पाहिले आहे. मी CAB चा अध्यक्ष झालो आहे, मी BCCI चा अध्यक्ष झालो आहे आणि भविष्यात मी आणखी मोठी कामे करत राहीन, पण ती 15 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असतील.

भारतीय संघाने अनेक सामने जिंकले

सौरव गांगुलीची गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने टीम इंडियाला परदेशात जिंकायला शिकवले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2003 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. गांगुलीने भारतासाठी 113 कसोटी सामने आणि 311 एकदिवसीय सामने खेळले आहेत.