विराट कोहलीसोबत वर्ल्ड कप खेळणारा सहकारी विकतोय छोले भटुरे!

टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत खेळणारा त्याचा सहकारी सध्या छोले भटुरे विकत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप संघातील या खेळाडूवर रस्त्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 13, 2017, 04:52 PM IST
विराट कोहलीसोबत वर्ल्ड कप खेळणारा सहकारी विकतोय छोले भटुरे! title=
छाया सौजन्य : ट्विटर, सोशल मीडिया

मुंबई : टीम इंडियाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत खेळणारा त्याचा सहकारी सध्या छोले भटुरे विकत आहेत. क्रिकेट वर्ल्ड कप संघातील या खेळाडूवर रस्त्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आलेय.

टीम इंडियात या खेळाडूला स्थान न मिळाल्याने आणि खराब कामगिरीमुळे विराटच्या सहकाऱ्यावर ही वेळ आलेय. पेरी गोयल असे या क्रिकेट खेळाडूचे नाव आहे. त्याचे छोले भटुरे विकणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सोशल मीडियात सध्या पेरी गोयलची चर्चा जोरदार आहे.

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये २००८मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीमने चांगली कामगिरी करत  क्रिकेट वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.  क्रिकेट वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूवर अशी वाईट वेळ आलेय. पेरी गोयल यांची अंडर १९ वर्ल्डकपमध्ये राखीव विकेट कीपर म्हणून निवड झाली होती. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

विराट कोहलीच्या संघात पेरी गोयलबरोबर रवींद्र जाडेजा, मनिष पांडे हे खेळाडू होते. यामध्ये रवींद्र जाडेजा, मनिष पांडे यांनी टीम इंडियात स्थान मिळाले. मात्र, पेरिला संघात स्थान मिळाले नाही. सध्या त्याला काम नसल्याने त्याच्यापुढे छोले भुटेरी विकण्याशिवाय पर्याय नव्हता. 

टीम इंडियाची  बांधणी २००८ मध्ये  एम एस धोनीच्या नेृत्वाखाली करण्यात आली. त्यावेळी विरोट कोहलीच्या संघाने अंडर १९ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत चषक जिंकला. विराटच्या संघातील अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले. त्यामुळे धोनीला विराटसह अन्य खेळाडू मिळाले. 

विराट कोहलीसोबत खेळल्यामुळे पेरी गोयल हिरो झाला होता. त्याचे नाव टीम इंडियासाठी चर्चेत होते. मात्र, अंडर १९ वर्ल्डकपनंतर त्याला खेळात चांगली कामगिरी करता आली नाही. खेळात सातत्य नव्हते. त्यामुळे पंजाबकडून खेळणाऱ्या पेरीला संघात स्थान मिळाले नाही.
 
विराटचा हा सहकारी सध्या लुधियाना महापालिकेबाहेर छोले भटुरे विकत आहे. पेरीची ही कहाणी सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.