Former Pakistani cricketer Shahid Afridi : पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला इतकी वर्ष क्रिकेट खेळूनही त्याला LBW चा फुलफॉर्म माहित नाही. सोशल मिडियावर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नेटकरी सोशल मीडियावर शाहिद आफ्रिदीाची चांगलीच खिल्ली उडवताना दिसत आहेत.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 524 सामने खेळले आहेत. 22 वर्ष त्याने क्रिकेट विश्वात त्याने आपला दबदबा कायम ठेवला होता. क्रिकेट क्षेत्रात धुमाकूळ घालणारा आफ्रिदी नुकताचं पाकिस्तानी टीव्ही चॅनेलवरील अफरीन फैजल खुरेशीच्या सलाम जिंदगी या शोमध्ये त्याची खास मुलाखत झाली. या शो मध्ये त्याने एक मजेशीर खेळ खेळला. यात आफ्रिदीच्या कानावर हेडफोन लावले आणि खेळात त्याला लिप्सिंग केलेला शब्द ओळखायचा होता. हा शब्द LBW म्हणजेच Leg Before Wicket असा होता.
शो मधील निवेदकाने आफ्रिदीला लिप्सिंग केलेला शब्द ओळखायला पुरेपुर मदत केली.त्याने सुरुवातीचे 2 शब्द 'लेग बिफोर ' ओळखले,माञ तिसरा शब्द ' विकेट ' ओळखण्यात आफ्रिदी अपयशी ठरला.त्यानंतर आफ्रिदीला त्याचे हेडफोन हटवून त्याला लिप्सिंग द्वारे न ओळखता आलेला शब्द विकेट होता असे सांगण्यात आले. त्यानंतर माञ आफ्रिदी जे बोलला ते कोणीच अपेक्षित केलं नव्हतं.
पाकिस्तानकडून पाचशेहून अधिक आंतररष्ट्रीय सामने खेळणाऱ्या आफ्रिदीने निवेदकाला विचारलं की, " क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट काय असतं ?' हा शब्द मी पहिल्यांदाचं ऐकतोय." हे ऐकताचं उपस्थित असलेल्या सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला.घडलेल्या प्रकारची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
Pakistan's no1. all-rounder . pic.twitter.com/32Djx66eZf
— Hun (@nickhunterr) August 19, 2023
घडलेल्या प्रकाराची व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेयं.ही व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आहे.य पूर्वीही पाकिस्ताानच्या अनेक खेळाडूंच्या अशा अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत आणि नेटकऱ्यांनी अनेकदा त्यांना मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं आहे.