'नाईटहूड' देऊन सन्मान, आता 'सर' एलिस्टर कूक

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कूक याचा नाईटहूड देऊन सन्मान करण्यात आला.

Updated: Feb 27, 2019, 08:08 PM IST
'नाईटहूड' देऊन सन्मान, आता 'सर' एलिस्टर कूक title=

लंडन : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कूक याचा नाईटहूड देऊन सन्मान करण्यात आला. मंगळवारी बकिंगहम पॅलेसमध्ये इंग्लंडच्या राणीच्या हस्ते कूकला हा पुरस्कार देण्यात आला. यामुळे आता कूकचा उल्लेख सर एलिस्टर कूक असा होणार आहे. या पुरस्कारामुळे आपण आनंदी असल्याची प्रतिक्रिया कूकनं दिली.

याआधी २००७ साली इयन बोथम यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर १२ वर्षांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूला हा सन्मान देण्यात आला. भारताविरुद्ध २०१८ साली कूकनं क्रिकेटमधून संन्यास घेतला. या मॅचमध्ये कूकनं शतक ठोकलं होतं. यानंतर कूकनं काऊंटीमध्ये इसेक्सशी ३ वर्षांचा करार केला. १९९० नंतर क्रिकेट खेळत असतानाच क्रिकेटपटूला हा सन्मान होण्याची पहिलीच वेळ आहे. याआदी १९९० साली न्यूझीलंडचे ऑल राऊंडर सर रिचर्ड हॅडली यांना क्रिकेट खेळत असतानाच या पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

एलिस्टर कूक हा टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक शतकं(३३), सर्वाधिक रन(१२,७४२) करणारा आणि सर्वाधिक टेस्ट मॅच(१६१) खेळणारा खेळाडू आहे. एलिस्टर कूक हा इंग्लंडचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे. कूकच्या नेतृत्वात इंग्लंडनं ५९ टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवला. एवढच नाही तर कूकनं इंग्लंडकडून सर्वाधिक १७५ कॅचही घेतले.