म्हातारा झालाय, बरं झालं...; Ajinkya Rahane बाबत माजी क्रिकेटरचं वादग्रस्त वक्तव्य

भारतीय निवड समितीच्या या निर्णयाचं कौतुक करत अजिंक्य रहाणेवर ताशेरे ओढले आहेत.

Updated: Jun 8, 2022, 11:29 AM IST
म्हातारा झालाय, बरं झालं...; Ajinkya Rahane बाबत माजी क्रिकेटरचं वादग्रस्त वक्तव्य title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सामन्यासाठी भारताने टीम इंडियामध्ये अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मासारख्या खेळाडूंना स्थान दिलेलं नाही. अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवर गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने भारतीय निवड समितीच्या या निर्णयाचं कौतुक करत अजिंक्य रहाणेवर ताशेरे ओढले आहेत.

भारतीय निवड समितीचा हा सर्वोत्तम निर्णय असल्याचं ब्रॅड हॉगचं म्हणणं आहे. हॉग म्हणाला की, अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा चांगली कामगिरी करत नव्हते. शिवाय त्याचं वयंही होतंय. अशा परिस्थितीत तरुणांना संधी द्यायला हवी, जेणेकरून त्यांना अनुभव असलेल्या खेळाडूंसोबत खेळता येईल.

भारताच्या टेस्ट टीममध्ये श्रेयस अय्यर, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या युवा खेळाडूंच्या स्थान दिल्याबद्दल ब्रॅड हॉगने आनंद व्यक्त केलाय.

तो म्हणाला की, श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी दीर्घकाळ खेळणार आहे, तो विराट कोहलीसोबत फलंदाजी करेल आणि आगामी काळात तो खूप यशस्वी ठरेल. 

अजिंक्य रहाणेला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती, त्यामुळे तो काही आठवडे मैदानापासून दूर राहिलाय. तो बराच काळ फॉर्ममध्ये नसला तरी त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतूनही वगळण्यात आलं होतं. त्याचबरोबर इशांत शर्माही खराब फॉर्ममध्ये असून त्याला संघात स्थान मिळवता आलेलं नाही.

1 जुलैपासून टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध टेस्ट सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून, काउंटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा टीममध्ये सिलेक्शन झालं आहे.