Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी

Virat Kohli: बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 20, 2023, 08:11 AM IST
Virat Kohli: मला माफ कर कारण...; भर मैदानात विराटने 'या' खेळाडूची मागितली माफी title=

Virat Kohli: वर्ल्डकपचा 17 वा सामना भारत विरूद्ध बांगलादेश ( India vs Bangladesh ) यांच्यामध्ये खेळवण्यात आला आहे. या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) बांगलादेशाचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. बांगलादेशाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा किंग विराट कोहलीने ( Virat Kohli ) शानदार शतक झळकावलं. यावेळी विराटने नाबाद 103 रन्सची खेळी केली. मात्र सामन्यानंतर भर मैदानात विराटने एका खेळाडूची माफी मागितलीये. 

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशाच्या टीमने 256 रन्स केले. हे आव्हान स्विकारण्यासाठी भारताकडून रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या तिघांच्या उत्तम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून अवघ्या 41.3 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केलं. ज्यामध्ये विराट कोहलीने ( Virat Kohli ) सर्वाधिक 103 रन्सची खेळी केली. मात्र सामना जिंकल्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये विराटने ( Virat Kohli ) माफी मागितलीये.

सेंच्युरीनंतर Virat Kohli चं मोठं वक्तव्य

2023 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय मिळवला. या सामन्यात सुरुवातीला बांगलादेशाची टीम मजबूत स्थितीत दिसून येत होती. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांनी भारताला दमदार कमबॅक करवून दिलं. या सामन्यात रवींद्र जडेजा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. जडेजाने 10 ओव्हर्समध्ये 38 रन्स देत 2 विकेट्स घेतले. यानंतर फलंदाजीमध्ये विराट कोहलीने शतक झळकावून त्याच्याकडून 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला. 

'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाल्यानंतर विराट कोहली ( Virat Kohli ) म्हणाला की, जडेजा, मला माफ कर, मी हा मॅन ऑफ द मॅच तुझ्याकडून हिसकावून घेतला. मला यावेळी फिनीश करायचं होतं. मी यामध्ये पन्नास रन्स करत होतो पण मी शतक झळकावत नव्हतो. पहिल्या चार बॉल्समध्ये दोन फ्री हिट्स मिळणं हे स्वप्नासारखं होतं. खेळपट्टी बऱ्यापैकी चांगली होती. त्यामुळे फलंदाजी सोपी होती. आमच्या टीममधील प्रत्येकजण एकमेकांना सपोर्ट करतोय. तसंच आमच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप चांगले वातावरण आहे.

भारतात वर्ल्डकप खेळणं ही नेहमीच चांगली भावना असते. आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता, असंही विराट कोहलीने ( Virat Kohli ) म्हटलंय.

विराट कोहलीने पूर्ण केले 26 हजार रन्स

विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये 48 शतकं पूर्ण केली आहेत. तो सचिन तेंडुलकरपेक्षा एका शतकाने मागे आहे. सचिनच्या नावे नावावर 49 शतकं आहेत. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 26, 000 रन्स देखील पूर्ण केले आहेत.