FIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star

अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता

Updated: Dec 10, 2022, 05:10 PM IST
FIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star title=

FIFA World Cup Quarter Final Match: अर्जेंटीनेना (Argentina) शुक्रवारी संपूर्ण संघर्ष करत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. अगदी अटीतटीच्या सामन्यात पेनल्टी-शूटआऊटच्या (Penalty Shootout) 4-3 मदतीने नेदरलँड्सला (Netherlands) धूळ चारली. या मॅचमध्ये अनेक खेळाडूंना यल्लो कार्ड देखील मिळालं, शिवाय भांडणं देखील. एकंदरीत या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता. 

झालं असं की, या सामन्यादरम्यान एका व्यक्तीने मैदानात थेट एन्ट्री घेतली. ज्यामुळे अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) सामना काही काळ थांबवावा लागला. हा व्यक्ती एक पॉर्न स्टार (Porn star) असल्याचं नंतर लक्षात आलं. 

मैदानात घुसललेल्या या व्यक्तीचं नाव विताली जोदोरोवेत्सकी आहे. हा रूसचा युट्यूबर देखील आहे. असं कृत्य करण्याची वितालीची ही पहिलीच वेळ नव्हती. 2014 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये देखील त्याने असं कृत्य केलं होतं. शुक्रवारी रात्री विताली टॉपलेस होऊन मैदानात घुसला होता. त्याच्या छातीवर  'विताली GOAT' असं लिहिलं होतं. 

युट्यूबवर 10 मिलियन सब्सक्रायबर्स

वितालीने काही पॉर्न सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. त्याचे युट्युबवर 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी सब्सक्रायबर्स आहेत. विताली साधारणपणे एक्स-रेटेड व्हिडीओ त्यांच्या यू-ट्यूब चॅनलवर अपलोड करतो. वितालीची एक्स गर्लफ्रेंड किन्से वोलांस्की हिने 2013 साली बिकनी घालून फुलटबॉल ग्राऊंडवर एन्ट्री घेतली होती. या घटनेनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. किन्से वोलांस्कीचे इन्स्टाग्रामवर अनेक चाहते आहेत.

अजून एक व्यक्ती घुसला होता मैदानात

क्वार्टर फायनलच्या या सामन्यात वितलीशिवाय अजून एका व्यक्तीने मैदानात एन्ट्री घेतली होती. लिओनेल मेस्सी ने गोल मारला होता, त्यानंतर काही वेळाने एका व्यक्ती मैदानात धावत असल्याचं दिसून आलं.