FIFA World Cup मध्ये आणखी एक उलटफेर, आता रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव

FIFA  World Cup 2022 मध्ये आता रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघालाही मोठा धक्का, (South Korea vs Portugal)

Updated: Dec 3, 2022, 12:06 AM IST
FIFA  World Cup मध्ये आणखी एक उलटफेर, आता रोनाल्डोच्या पोर्तुगालचा पराभव title=

FIFA  World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीपासूनच मोठे उलटफेर झालेले दिसले. कमकुवत असलेल्या संघांनी मोठमोठ्या संघांना पराभवाचा धक्का दिला होता. आताच पार पडलेल्या मॅचमध्ये साऊथ कोरियाने पोर्तुगाल (South Korea vs Portugal) संघाचा 2-1 ने पराभव केला आहे. (Fifa World Cup 2022 south korea defeated portugal latest marathi football News)

 

सामन्यामधील पहिला गोल रिकार्डो होर्टा करत पोर्तुगालने करत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर साऊथ कोरियाने आक्रमक पवित्रा घेत मुसंडी मारली. त्यांनी 27 व्या मिनिटाला गोल केला आणि सामन्यामध्ये बरोबरी साधली. हा गोल किम युंग ग्वॉनने केला. पहिल्या हाल्फमध्ये सामना 1-1 ने बरोबरीत होता. दुसरा हाल्फ चालू झाल्यानंतर साऊथ कोरियाने दमदार खेळ करत अतिरिक्त वेळेत गोल केला आणि विजयी आघाडी घेतली आणि 2-1 सामना खिशात घातला.