FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा

Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.

Updated: Dec 18, 2022, 02:30 PM IST
FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा title=

FIFA World Cup 2022 Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं अर्जेंटिना आणि फ्रान्स (Argentina Vs France) या अंतिम फेरीतील संघापैकी मेस्सीच्या संघाला पसंती दिली आहे. अर्जेंटिनाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींचं लक्ष निकालाकडे लागून आहे. अर्जेंटिनाने दोनदा विश्वचषकावर (FIFA World Cup 2022) नाव कोरलं आहे. अर्जेंटिनाने 19878 आणि 1986 ला जेतेपद पटकावलं. तर 1930, 1990 आणि 2014 रोजी उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यंदा तरी मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. 

अर्जेंटिनाचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे होते. अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला. या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला 2-1 ने पराभव सहन करावा लागला. या निकालामुळे मेस्सीचं स्वप्न भंगणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. मात्र त्यानंतर मेस्सीच्या संघानं जोरदार कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोचा 2-0 ने पराभव केला. त्यानंतर साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पोलंडला 2-0 मात देत सुपर 16 बाद फेरीत स्थान मिळवलं. सुपर 16 फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने धुळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्या अतितटीचा सामना रंगला. दोन्ही संघांनी 90 मिनिटं आणि एक्स्ट्रा टाईमध्ये 2-2 ने बरोबरी साधली. त्यानंतर निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. हा सामना अर्जेंटिनाने 3-4 ने जिंकला. उपांत्य फेरीत क्रोएशिया विरुध्द अर्जेंटिना या सामन्यात अर्जेंटिना 3-0 ने मात मिळवली. अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं. वर्ल्डकप इतिहासात अर्जेंटिनाने उपांत्य फेरीतील विजयी घोडदौड कायम ठेवली. 

बातमी वाचा- FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी

फ्रान्सचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

साखळी फेरीत फ्रान्सनं विजयी सलामी देत ऑस्ट्रेलियाचा 4-1 पराभव केला. त्यानंतर डेन्मार्कला 2-1 ने पराभूत केलं. पण तिसऱ्या सामन्यात टुनिसियाकडून 1-0 पराभव सहन करावा लागला. मात्र फ्रान्स बाद फेरीतील सुपर 16 फेरीत स्थान निश्चित केलं होतं. सुपर 16 फेरीत फ्रान्सनं पोलंडचा 3-1 ने धुव्वा उडवला आणि उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवलं. उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत उपांत्य फेरीत धडक मारली. डार्क हॉर्स म्हणून चर्चा असलेल्या मोरोक्कोशी उपांत्य फेरीत गाठ पडली. उपांत्य फेीरत फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 ने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सनं 2018 चा विश्वचषकावर नाव कोरलं होतं. वर्ल्डकप 2018 मध्ये सुपर 16 मध्ये फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 नं पराभव केला होता.