Video: धोनीला भेटायला आली अन्... तरुणीची कृती चर्चेत! MSD म्हणाला, 'अगं...'

Female Fan Touches MS Dhoni Feet Video: महेंद्र सिंह धोनीचे लाखो चाहते त्याचा भेटण्यासाठी गर्दी करतात. धोनी या चाहत्यांना भेटल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 28, 2023, 01:49 PM IST
Video: धोनीला भेटायला आली अन्... तरुणीची कृती चर्चेत! MSD म्हणाला, 'अगं...' title=
धोनीचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Female Fan Touches MS Dhoni Feet Video: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या चाहत्यांची संख्या केवळ देशातच नाही परदेशातही फार जास्त आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ अनेक वर्ष लोटली असली तरी त्याची लोकप्रियता थोडीही कमी झालीली नाही. आजही धोनी देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या त्यांच्या शहरामध्ये प्रचंड लोकप्रिय असतात मात्र धोनी आयपीएल खेळण्यासाठी जिथे जिथे जातो तिथे तिथे गर्दी होते. धोनीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून यामध्ये धोनीला भेटण्यासाठी आलेल्या धोनीच्या चाहतीने केलेली कृती अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मुलीचं आणि धोनीचंही कौतुक केलं आहे.

हात जोडून भेटायला येते

धोनी हा त्याच्या चाहत्यांना आवर्जून फोटो देतो. अगदी फोटोंसाठी थांबण्याबरोबरच ऑटोग्राफची मागणीही धोनी कधीच नाकारत नाही. धोनीने आपल्या एका चाहतीचं असेच एक स्वप्न पूर्ण केलं. या चाहतीला धोनीला भेटायचं होतं. त्याच्याबरोबर फोटो काढायचा होता. धोनीला भेटण्याची संधी मिळाली तेव्हा ही तरुणी धोनीच्या पाया पडली. त्यानंतर धोनीने या मुलीशी हस्तांदोलन केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी धोनीला भेटलायला येतानाच हात जोडून येते.

ती पाया पडते तेव्हा धोनी म्हणतो...

हात जोडूनच धोनीला भेटायला आलेली ही तरुणी धोनीजवळ आल्यानंतर त्याच्याशी हस्तांदोलन करण्याऐवजी थेट त्याच्या पायाशी वाकते. ही तरुणी पाया पडण्यासाठी वाकली असता धोनी तिला, "अगं हॅण्ड शेक कर" असं सांगताना दिसतो. पाया पडल्यानंतर धोनी या तरुणीशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करतो. ही तरुणी धोनीबरोबर हस्तांदोलन करते आणि नंतर फोटो काढून घेते. 

धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार

धोनी हा सोशल मीडियावर फार सक्रीय नाही. मात्र त्याचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियार व्हायरल होत असतात. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र अजूनही तो इंडियन प्रिमिअर लिगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करतो. धोनी अजून एक आयपीएलचं सिझन खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे. धोनीने 2023 च्या आयपीएलमध्ये संघाला पाचव्यांदा चषक जिंकून दिल्यानंतर मुंबई येऊन गुडघ्यावर शस्त्रक्रीया करुन घेतली होती. धोनीने आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात चाहत्यांसाठी पुढील पर्व खेळेल असे संकेत दिले होते.