मुंबई : फाफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे. राजस्थान रॉयल्सने बंगळूरूचा 29 रन्सने पराभव केला. कालच्या सामन्यातही बंगळूरूकडून निराशाजनक कामगिरी पहायला मिळाली. राजस्थानकडून बंगळूरूला 145 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. यावेळी बंगळूरूची टीम 115 रन्समध्ये ऑलआऊट झाली.
या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा फेल झाला. दरम्यान कालच्या सामन्यानंतर कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसने विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर फाफ ड्यू प्लेसिस म्हणाला, आम्ही गेल्या सामन्यानंतर हा विचार केला होता की, विराटला माझ्यासोबत सामन्याची ओपनिंग केली पाहिजे. विराट एक चांगला फलंदाज आहे मात्र तो सध्या वाईट काळातून जातोय. शिवाय विराट तो टीमसाठी लवकरच चांगली कामगिरी करणार आहे.
सामन्यासंदर्भात बोलताना फाफ म्हणाला, "आम्ही जे काही कॅच सोडले त्यामुळे आम्ही 25 रन्स एक्स्ट्रा दिले. आम्ही प्रयत्न करतोय की आमची टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करेल. या सामन्यातंही आम्ही टॉप ऑर्डरमध्ये बदल केले मात्र त्याचा फायदा झालेला दिसला नाही."
आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीसने सर्वाधिक 23 धावा केल्या. त्यानंतर वानिंदु हसरंगाने 18 धावा जोडल्या. शहबाज अहमदने 17 तर रजत पाटीदारने 16 रन्स केल्या. या व्यतिरिक्त आरसीबीच्या फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.