IPL 2022: पराभवानंतर Faf Du Plessis चं मोठं विधान

खराब फॉर्मनंतर फाफ ड्यु प्लेसिसचा विराट कोहलीला मोठा सल्ला 

Updated: May 14, 2022, 07:37 AM IST
IPL 2022: पराभवानंतर Faf Du Plessis चं मोठं विधान title=

मुंबई : बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात 54 धावांनी सामना पंजाबने जिंकला आहे. RCB ला प्लेऑफच्या स्पर्धेत मोठा झटका मिळाला आहे. विराट कोहली पुन्हा एकदा खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसला. सामना गमवण्याचे कारणही या मॅचनंतर फाफ ड्यु प्लेसिसने दिलं. एवढंच नाही तर कोहलीला फाफने सल्ला दिला आहे. 

कोहलीच्या खराब फॉर्मवर मोठं विधान 
विराट कोहली खूप जास्त मेहनत करत आहे. मात्र तो खराब फॉर्ममधून जात आहे. तो मेहनत करतोय फक्त त्याने पॉझिटिव्ह राहायला हवं. अनेक चांगल्या बाजू कोहलीकडे आहेत. आम्हाला आता पुढच्या सामन्याची तयारी करायची आहे. आमच्यासाठी पुढचा सामना जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. 

आम्ही जास्त विकेट्स घालवल्या. विराट कोहलीनंतर लागोपाठ विकेट्स पडल्या. जो दबाव होता तो राहिला नाही. एकामागे एक खेळाडू तंबुत परतले. त्यामुळे बंगळुरू टीमचं मनोबल खचल्याचं सांगितलं त्याचा तोटा आम्हाला झाला. 

IPL 2022 मध्ये विराट कोहली अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे. त्याच्या बॅटमधून एकही रन निघताना दिसत नाहीत. IPL 2022 मध्ये विराट कोहली तीनदा शून्यावर बाद झाला, दोनदा धावबाद झाला. 

आयपीएल 2022 च्या 13 सामन्यांमध्ये त्याने फक्त 236 धावा केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून त्याला क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ चांगली कामगिरी करत आहे. संघाने आयपीएल 2022 च्या 13 पैकी 7 सामने जिंकले आहेत. 
पंजाब किंग्जविरुद्ध 54 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आरसीबी संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी संघाला शेवटचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.