मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने विजयासह आपला प्रवास संपवला आहे. त्याने शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्स राखून पराभव केला. या पराभवामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली टीमचं प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगलं.
दरम्यान मुंबई इंडियन्सच्या फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला झाला. मुंबईने दिल्लीचा पराभव केल्याने आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरलीये. या सामन्यात मुंबईच्या विजयाचा शिल्पकार टिम डेव्हिड ठरला. त्याने 11 बॉल्समध्ये 34 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 सिक्स लगावले.
सामन्यानंतर टीम डेव्हिडने खुलासा केला की, आरसीबी टीमचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्याला मेसेज केला होता. यावेळी प्लेसिसने मेसेजमध्ये काय म्हटलं हे देखील टिमने सांगितलंय.
सामना संपल्यानंतर टीम डेव्हिड म्हणाला, 'विजयाने सिझन संपवणं हा खूप चांगला अनुभव आहे. खेळपट्टीवर फलंदाजी करणं थोडं कठीण होतं. इशान किशनने मला सांगितलं की, या खेळपट्टीवर खेळणं थोडं कठीण आहे. मी चेंडूला योग्य वेळ देण्याचा प्रयत्न करत होतो.'
टीम डेव्हिड म्हणाला, 'मला मॅचच्या सकाळी फाफ डू प्लेसिसचा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफचे फोटो होते. यावेळी तिघांनीही मुंबई इंडियन्सला सपोर्ट करण्यासाठी एमआय टीमच्या जर्सी घातली होती.