मुंबई : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात हैदराबादने बंगळुरूचा पराभव केला. बंगळुरूच्या लाजिरवाण्या पराभवानंतर फाफ ड्यु प्लेसीस चांगलाच लालबुंद झाल्याचं पाहायला मिळालं. कुठे चुकलं आणि सामना कसा हातून गेला हे फाफने मॅच संपल्यावर सांगितलं. हैदराबादने 9 विकेट्सने एकहाती सामना जिंकत बंगळुरूला तोंडघाशी पडलं. बंगळुरूचा हा यंदाच्या हंगामातील सर्वात वाईट पराभव म्हणावा लागेल.
कर्णधार डू प्लेसिसने सांगितलं पराभवाचे कारण
पावर प्लेमध्ये सर्वात जास्त धावांची अपेक्षा होती. मात्र तिथेच आम्ही चार ते पाच विकेट्स गमवून बसलो. सुरुवातील गोलंदाजांकडूनही चांगली कामगिरी झाली पण नंतर सगळंच बारगळलं. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट्स जाऊ न देणं हे फार महत्त्वाचं असतं ती काळजी घ्यायला हवी असं फाफ म्हणाला.
फाफ ड्यु प्लेसीसने मार्कोचं खूप कौतुक ककेलं. त्याच सोबत विराट कोहलीची विकेट काढणाऱ्याचंही कौतुक केलं. मार्कोने पहिल्यांदा बॉलिंग करून बंगळुरूच्या मोठ्या विकेट्स घेतल्या त्यामुळे उर्वरित टीमचं मनोबल खचलं आणि समाना हातून गेला.
या विकेटला सर्वोत्तम सांगितले
'मॅन ऑफ द मॅच' बनल्यानंतर मार्को जेनसेन म्हणाला की कोहली आणि डु प्लेसिसच्या विकेट्सपेक्षा अनुज रावतची विकेट घेताना खूप आनंद झाला. टी 20 मधील या ओव्हर्स माझ्या आजवरच्या सर्वोत्तम ओव्हर्स आहेत ज्या मी कधीच विसरू शकणार नाही.
सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 69 धावांचे आव्हान हैदराबादने 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला.
हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी केली. तर कॅप्टन केन विलियमसनने नॉट आऊट 16 रन्स केल्या. तर राहुल त्रिपाठीने सिक्स मारत हैदराबादला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून हर्षल पटेलने एकमेव विकेट घेतली.